भूत
डोईवर माझ्या
नाही टोपी तरी
जगण्याची रीत
सोपी नाही ...
खांद्यावर माझ्या
नाही जरी झेंडा
कधीमधी दांडा
तिरडीचा...
हातामधी माझ्या
नाही तलवार
कसे झेलू वार
देव जाणे...
पायामधी माझ्या
उरले ना त्राण
आवरतो प्राण
कंठाशी खिळले...
मला नाही ठावे
काय माझी जात
तरी नाही जात
भूत ते भयाचे...
आह्ह्ह्ह,
जबरदस्त...
आवडली.
सुरेख कविता!
क्या बात है! फारच छान कविता.
सुरेख अगदी
येक नंबर.
झकास
मस्त
काहीचं कळालं नाही राव :(
मला ही कविता
वाह!
नाखूजी.... व्वा व्वा व्वा....
नाही माझी नाही रे बाबा
नको, नको. तू ब्रेक मारु नकोस.
जरा फिनिशिंग हवं होतं का??
अप्रतिम