Skip to main content

बारा-तेरा वर्षांची ती..

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/09/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
बारा-तेरा वर्षांची ती.. ============================ लयदार वळणाची, उफाड्या देहाची यौवनानं मुसमुसलेली तारुण्यानं सळसळणारी बारा-तेरा वर्षांची ती.. बाल्य आणि तारुण्यामधल्या अवघड झुल्यात हेंदकळत पाय पोटाशीधरून बसलेली अवखळ, निरागस भावली..! हस म्हटलं की हसायची नाच म्हटलं की नाचायची.. खुलवलं की फुलायची चिडवलं की रुसायची.. नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी हसता-बोलता मध्येच थांबायची मोजून मापून वागणारी ती जरा प्रौढाचं वाटायची..! तिच्यावर रोखलेल्या नजरांची अगोचारी भोसकता झेलत टस्स का मस्स न होता मुर्दाडासारखी ढिम्म राहायची.. इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सोलू नका! असच म्हणायची.. दुखऱ्या नजरेनं गळतागळता दोन मोकळे श्वास मागायची.. मदत देऊ करणारी नजर मात्र तिला तेवढंच नाकारायची. ============================ स्वाती फडणीस........................... २३-०९-२००८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3824
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वेगळी ... आणि छान आहे !

कविता आवडली. एक शंका : दुसर्‍या कडव्यातला "भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली) आणि आवडली=भावली यांच्यावर श्लेष आहे का?

In reply to by धनंजय

"भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली) भावली=आवडली..म्हणू का?(तस मुद्दऊन लिहिलेल नाहीये) पण गेली १२ वर्ष लक्षात मात्र राहिलीये.

इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सोलू नका! असच म्हणायची.. दुखऱ्या नजरेनं गळतागळता दोन मोकळे श्वास मागायची.. मदत देऊ करणारी नजर मात्र तिला तेवढंच नाकारायची.

सुंदर!
लयदार वळणाची, उफाड्या देहाची यौवनानं मुसमुसलेली तारुण्यानं सळसळणारी
हे वाचल्यानंतर बारा-तेरा वर्षांची ती.. अंगावर काटा आणतं नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी किंवा जीव नका सोलु म्हणणारी कविता अतिशय "भावली" -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अत्यंत दाहक आणि वास्तववादी कविता - तिच्यावर रोखलेल्या नजरांची अगोचारी भोसकता झेलत टस्स का मस्स न होता मुर्दाडासारखी ढिम्म राहायची.. अगदी बारा नव्हे पण तेरा-चौदा वर्षांच्या मुलींवर रोखल्या गेलेल्या अशा वखवखत्या नजरा पाहिल्या आहेत... इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सोलू नका! असच म्हणायची.. हंम्म.. हे विचारायचा अगोचरपणादेखिल करतात काही लोक... मदत देऊ करणारी नजर मात्र तिला तेवढंच नाकारायची. अपवादानेच नियम सिद्ध होतो म्हणतात... असो, तुमची ही कविता कुठच्या कुठे भरकटत घेऊन गेली... (निशब्द) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.