Skip to main content

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 09/07/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 176915
प्रतिक्रिया 484

प्रतिक्रिया

जे काही चालले होते आणि चालले आहे ते मिपाला भुषणावह नाही. या असल्या चर्चांमधून कोणाचाही आयडी बॅन होणे हे तर फारच वाईट... मला वाटते एवढे झाल्यावर तरी सगळ्यांनी आपापल्या तलवारी म्यान कराव्यात व विधायक लेखनासाठी लेखणी उचलावी..... शेवटी आपल्या सगळ्यांची इच्छा....

In reply to by जयंत कुलकर्णी

तुमचे अत्यंत योग्य असले तरी मी धागाकर्ता असल्याने या धाग्याची समारोपीय पोस्ट माझी असणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.
मिपाला भुषणावह नाही
तसं असेल तर मी माझ्यापरिने एक पर्याय देऊ इच्छीतो की हा धागाच उडवून टाकावा.

In reply to by आनन्दिता

हेच म्हणतो. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. इतर लोकांनी काही मत व्यक्त केले नाही याचा "इतरांना माझे लेखन आवडते" असा सोयिस्कर अर्थ त्यांनी लावलेला आहे. प्रांता-प्रांतातील शेती वेगळी, तिची दुखणी वेगळी असतात हे सत्य मान्य करुनही एक शेतकरी कुटुंबात वाढलेला, शेतीत खेळलेला आणि लहानाचा मोठा झालेला मुलगा म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते की मुटेंच्या या असल्या पुढारीपणातून शेतकर्‍याचे काही भले होईल असे वाटत नाही. झाले तर नुकसान होण्याचीच शक्यता आहे. ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे.

In reply to by सतिश गावडे

मुटे ईतके उद्घट आणि उर्मट वागुन त्यान्च्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही हा मोठा प्रश्नय

In reply to by सतिश गावडे

१. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही. २. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही? ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे. ह्याच्याशी मात्र सहमत आहे. तसेच तो त्यांच्या आवडीचा उद्योग आहे. करु देत. मिपावर आले म्हणून आपल्याला माहिती झाले, नस्ते आले तर कोण कुठले गंगाधर मुटे, काय काम करतात हेही कळले नसते. मिपाबाहेरच्यांना (किंवा त्या दहा हजार फॉलोअर्सशिवाय) तर अजूनही माहित नसेल पाळेकर तीस वर्षापासून कार्यरत आहेत, वीस लाखाहून अधिक शेतकर्‍यांची आयुष्य बदललीत त्यांनी. तरी शहरी लोकांना आत्ता माहित झाले. मिसळपाववर झिरोबजेटशेतीचे तंत्रज्ञानाबद्दल धागे काढले असते तर त्यांचीही हुर्यो उडवण्यात आली नसती ह्याबद्दल खात्री देऊ शकत नाही. देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते. ;)

In reply to by संदीप डांगे

देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते.
हा प्रश्न प्रामाणिक वाटतो. भंडावणे वगैरे नाही. जेव्हा आपण एखादा दावा करतो तेव्हा तो शास्त्रशुद्ध फिल्ड एक्सपरिमेन्टद्वारेही सिद्ध करता आला पाहिजे.अनेकानेक शेतकर्‍यांना व्यक्तिगत चांगले अनुभव आले असतीलही आणि पाळेकरांचा अनुभव अतिशय दांडगा आहेच, पण तरीही जेव्हा हे नियंत्रित प्रयोगाद्वारे तपासले जाईल तेव्हा ते तसे सिद्ध व्हावे. यामुळे देशी गाईच्या गोमूत्राचे रासायनिक आणि जीवशास्त्रीय असे कोणते घटक आहेत ज्यामुळे विशेष फायदा होतो ते पण कळेल.

In reply to by स्वामी संकेतानंद

स्वामीजी, तुमचे म्हणणे खरे आहे पण माझ्या 'भंडावून सोडणे' ह्या शब्दाच्या वापरामागे इथेच वाचलेली एक आयुर्वेद बद्दलची चर्चा आहे. आयुर्वेद डॉक्टर आपल्या पद्धतीने समजवून नीट सांगत होते, प्रश्नकर्ता नुसता किस पाडत होता. असे अनेकदा अनेक बाबतीत झाले आहे. अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत कैच्या कै दावे करतात, त्यांना कोणीही हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करा आणि मग बोला असे म्हणत नाही. मुकाटपणे उत्पादने वापरतात. असो. एखादी गोष्ट वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेली आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा असणे वेगळे. पण नुसतं आपल्याला पटत नाही म्हणून आपलेच म्हणणे रेटत भंडावून सोडणे वेगळे. तसे मिसळपाववर घडतांना पाहिले आहे इतकेच सांगायचे होते.

In reply to by संदीप डांगे

सहमत, आणि प्रसिद्धीलोलूप म्हणायला त्यांनी धागा काढणे एवढेच केले होते. ना खरडवह्यात येऊन ना व्यनि करून आवतण धाडले होते. ना व्हॅटसप वर पिंगत होते कि द्यारे मला प्रतिसाद. आधीच्या त्यांच्या बर्याच धाग्याना मर्यादीत प्रतिसाद होते. तेवढ्यावर भागले असते. आता सांगा उचकवले कोण? चुकीचा निवाडा करायला आपण कुणीच जज्ज नाही आहोत सो इतके झाल्यावर मुटे तुम्हारा चुक्याच अशी भूमिका घेणे मला तरी पटलेले नाही.

In reply to by अभ्या..

असं मला देखील वाटतंय. अर्थात मी कोण म्हणा! बोका ने मुटे दारु पिउन पडले असतील असं लिहिलं होतं. त्यावर हे आवडलं नाही असं लिहीलं होतं. बाकि मुटे अथवा बोका हे दोघे सुद्धा मित्र अथवा शत्रु दोन्हि पैकी एकही नाहियेत.

In reply to by अभ्या..

माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत असाल तर मी ही शेतकरी कुटुंबातील असल्याने मला हा शेतकर्‍यांबद्दलचा कळवळा बेगडी वाटतो. हे असल्या कायम आक्रमक हल्ल्याच्या स्वरुपातील काव्यशेतीने शेतकर्‍याचे काहीही भले होणार नाही. आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला.

In reply to by सतिश गावडे

आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला. +११

In reply to by सतिश गावडे

गावडे सर नमस्कार, आपली भूमीका कळाली. आता असे धरून चालू कि मुटे सर पुढारीपण करताहेत. ओके. कुणाचे? आपले? शेतकऱयांचे? आपल्या प्रतिसादावर ठरणारे का त्यांचे पुढारीपण? आपण दोघेही शेतकरी कुटुंबातले आहोत. ओके. काय फरक पडणारे आपल्या निषेधाच्या प्रतिसादाने? त्यांची भूमिका बेगडी आहे. ओके. अस्सल भूमिका कुणाची आहे आपणास ठाऊक आहे का? आपणास म्हणजे आपणा सर्वानाच. शेतकऱयांचे भले होणार नाही. ठीक आहे. ज्याने भले होईल अशे चार मार्ग आपण हुडकून काढू. काय म्हणता? राहता राहिले विरोधी मत मांडूच नये का? अवश्य मांडावे. अगदी संदर्भासहित मांडावे. धागा कवितेचा, कशाला करायचा काथ्याकूट? त्यावर धागाकरत्याने खुलासा द्यावा अशी अपेक्षा पण करू नये. प्रश्नच मिटतो. उत्तर दिलेच पाहिजे असा आग्रह होतो तेव्हा वेगळे वळण मिळते.

In reply to by संदीप डांगे

गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही?
पक्षपातीपणा करायचा असता तर काही प्रतिसाद खटकले असं लिहीलंच नसतं. :)

In reply to by सतिश गावडे

खटकण्यासारखे असतीलही. (डळमळीत विधान) अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. (ठाम विधान) ह्यामुळे वाटले तसे..

अरेरे! अय्या! आयला! काय सांगता? कैच्या कै... शी बाबा! हा अन्याव आहे. बरं झालं. का पण? झालं?

बोका-ए-आझम - Tue, 19/07/2016 - 19:57 का स्वतःचा वेळ वाया घालवताय? मनोरुग्णांसोबत वादविवाद करायची एवढी हौस का आलीय आज तुम्हाला? http://www.misalpav.com/comment/859096#comment-859096 ------------------------ धाग्याचा सारांश: बोका-ए-आझम - Wed, 20/07/2016 - 23:42 मै तो हूं पागल ये कहूं हर पल कर कोई हलचल होने दे होने दे होने दे होने दे होने दे कोई दीवानगी...! http://www.misalpav.com/comment/859875#comment-859875 ------------------------ @अजया @आनन्दिता @शि बि आय गंगाधर मुटेला मनोरुग्न आता कोण म्हणेल, असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? तसे असेल तर तुम्ही तसा प्रतिसाद लिहिला आहे आणि मी वाचला आहे, अशी आपण समजूत करून घेऊयात ना! कुणाचाही आयडी बॅन होणे दुर्दैवीच आहे. बोका-ए-आझमचा आयडी बॅन झाला काय किंवा बंदी उठवली काय, मला यात रस नाही.

In reply to by मितभाषी

मितभाषी साहेब, लोखंडी तलवारीशी सोन्याची ढाल घेऊन लढता येत नाही. स्वतःचा जीव गमावायचा नसेल तर ढालही लोखंडाची किंवा त्यापेक्षाही टणक धातूची असावीच लागले. पर्याय नसतो. इलाज नसतो.

In reply to by आनन्दिता

मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही. ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं. जसा प्रश्न असतो तसे उत्तर असते. जसे उत्तर असते तसे प्रत्यूत्तर असते. आपण माझे २७/०७/२०१४ ते २७/०७/२०१४ अशा सलग चार वर्षाचे माझे जुने धागे वाचावेत. आणि मी कुणाला अपमानास्पद बोललोय का, ते शोधावे. दोन वर्षात मी काही आयड्यांशी (सर्व नव्हे) असे का वागतो, याचाही शोध तुम्हीच घ्यावा. माझा एक शेर ऐकवतो तुम्हाला आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने हा जुना शेर आहे. मी फक्त शेर ऐकवला, नाही तर तुम्ही म्हणाल की मी लोकांना लांडगा म्हटले.

In reply to by गंगाधर मुटे

मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही.ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं.
इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.
दोन वर्षात मी काही आयड्यांशी (सर्व नव्हे) असे का वागतो, याचाही शोध तुम्हीच घ्यावा.
बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?
हा जुना शेर आहे. मी फक्त शेर ऐकवला, नाही तर तुम्ही म्हणाल की मी लोकांना लांडगा म्हटले.
कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय! असो!!

In reply to by आनन्दिता

इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.
माझा प्रतिसाद नीट वाचलात का? वाचला असेल तर समजला का? का निष्कारण धाग्याची लांबी वाढवता? मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही. ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं. जसा प्रश्न असतो तसे उत्तर असते. जसे उत्तर असते तसे प्रत्यूत्तर असते. असे लिहिले होते मी...!
बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?
कधीचाच घेतला आहे. रोग कळला आहे म्हणून उपचार नेमकेपणाने सुरू आहेत. औषध कडू असल्याने रोग्याला व त्याच्या नातेवाईकाला आवडत नसेल तर त्याला इलाजकर्त्याचा नाईलाज आहे.
कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय!
हे तुमचं स्वतःच मत आहे. वाटेल तसं मत बाळगण्याचं स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला आहे. मी यात दखल द्यावी असं काहीही नाही.

In reply to by गंगाधर मुटे

तुमचे प्रतिसाद म्हणजे काय स्टिफन हॉकिंग्ज च्या थिअरीज आहेत का न कळायला? बाकी धाग्याची लांबी वाढवण्यापेक्षा ही मला तुमच्यावर शब्द , वेळ वाया घालवायचा कंटाळा आलाय. राम राम __/\__

In reply to by सामान्य वाचक

रामराम नमस्कार जयश्रीराम वालेकुमसलाम जयभीम टाटा बायबाय गूडमॉर्निंग/नून/इव्हिनिंग खुदा हाफ़िज काळजी घ्या. जपा स्वत:ला. रस्त्याने चालतांना स्वत:ला सांभाळा. शक्यतो डावी बाजू सोडू नका. क्यूं की बचेंगे तो और लढेंगे...! हर राहपर, हरमोड पर.. मिलते रहेंगे...! लढते रहेंगे...!! झगडते रहेंगे...!!! हे अपरिहार्य आहे कारण.... जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही... हे विधीलिखीत आहे... आणि ते खोटे नाही!!!! b r n

४४० व्होल्ट है , छुना है मना.

तसेच आत्महत्येला प्रवृत्त करणे हा पण गुन्हा आहे आणि त्याला पण शिक्षा होते कायद्याने

कंपूबाजांच्या झुंडीने त्रास दिला तरी मुटेसाहेबानी जो आत्मविश्वास दाखवला आहे, तो कौतुकास्पद आहे.

In reply to by सामान्य वाचक

कंपूवाले तरी दुसरं काय करतात ? अहो विडंबनम अहो प्रतिसादम !

: समारोप :

आंतरजालाच्या सुसंस्कारीत, सुशिक्षित, सुजान, आणि अभ्यासू जगतात २००९ मध्ये माझा चंचूप्रवेश झाला. २००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे कारण ......... सांप्रत हिंदुस्थानातल्या मनुष्यजातीच्या एका झुंडीला लढायची व संघर्ष चेतवता ठेवण्याची प्रचंड आवड आहे. त्यातूनच एकटेपणाने लढण्याऐवजी झुंडीने लढण्याची प्रवृती वाढत गेली असावी. यातूनच निर्माण झाला असावा वर्गसंघर्ष. वर्गसंघर्षाची काही लक्षणे आणि वैशिष्टे : १) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला हीन/न्यून लेखने. २) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाचे शोषण करून त्या वर्गाला आपल्या पायदळी ठेवण्याचा प्रयत्न करणे. ३) एका वर्गाला दुसर्‍या वर्गाची बरोबरी करता येत नसले तर थेट दुसर्‍या वर्गाचे अहीत चिंतने. ४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला जबाबदार ठरवणे. ५) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्याच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या कशा होतील, याचेच प्रयत्न करणे. ६) वगैरे वगैरे. वर्गसंघर्षाची काही उदाहरणे : १) दलित विरुद्ध सवर्ण २) हिंदू विरुद्ध मुस्लिम ३) मराठा विरुद्ध ब्राह्मण ४) बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक ५) अल्पजन विरुद्ध बहुजन ६) वगैरे वगैरे खरं तर वर्गसंघर्षाची ठीणगी पाडायला आणि ज्योत पेटती ठेवायला कोणत्याही वर्गातल्या सर्वच व्यक्ती अजिबात कारणीभूत नसतातच. कारणीभूत असतात फ़क्त त्या-त्या वर्गातल्या झुंडी. झुंडीच हे कार्य इमाने इतबारे करित असतात आणि त्याचे फ़टके तो संपूर्ण वर्ग, तो संपूर्ण समाज, ती संपूर्ण जात भोगत असते. ही बाब सर्वमान्य नसली तरी माझ्या ७ वर्षाच्या आंतरजालीय अनुभवावरून या निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतकरी विरुद्ध सुशिक्षित बिगरशेतकरी असा छुपा संघर्ष अस्तित्वात आहे. हा वर्गसंघर्ष नसला तरी वर्गसंघर्षाची बहुतांशी लक्षणे आणि वैशिष्टे जशीच्या तशी लागू होत आहेत. यातून या देशाची सुटका कधी होणार आहे हे भगवंताशिवाय कोणीच सांगू शकत नाही, अशी स्थिती मात्र नक्कीच आहे.

In reply to by एस

२००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. सगळं जगंच तिरपे आहे त्याला कोण काय करणार आणि ते कसं सुधारणार? तरी बरं ते स्थळ दुसरंच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

-१ तुम्ही ७ वर्षापासून तुमचा चष्मा तोच आहे असा अर्थही निघतोय त्यातून. आणि पुढचे १७ काय ७० वर्षेही तेच दिसणार तुम्हाला जर चष्मा नाही बदलला तर.. रच्याकने, तुमच्या लिखाणात मला ही लक्षणे जाणवली. १) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला हीन/न्यून लेखने. ४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला जबाबदार ठरवणे. ६) वगैरे वगैरे.

माझं वरातीमागुन घोडं आहे पण मला आज कळालं की बोकाभाऊ उडाले. इथे काय दंगा झालाय ते माहीत नाही. पण मोसाद सिरिज अडकल्याने भयानक म्हणजे भयानक वाईट वाटलं. बोकाभाऊ इथे परत यायला हवेत. त्यांना कधी मर्यादा सोडून लिहीताना पाहिलेले नाही. आणि इतक्या झटपट आयडी बॅन झाला तेव्हा वॉर्निंगसुद्धा न देता अशी कारवाई झाली की काय अशी शंका आली. आणि इतकं असं बोकाभाऊ काय बोलले असतील असा प्रश्न पडला. बोकाभाऊ लवकर परत येवोत. मिपावरच्या उत्तम लेखकांपैकी एक ते आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

राजकीय चर्चा वाचत नाही का ओ तुम्ही? बोकाभाऊ नी अनेकांना अनेक वेळा शिव्या दिलेल्या होत्या. अर्थात त्या मर्यादित स्वरूपात असू शकतील. ;) संपादक दुत्त दुत्त असतात नेहमीच. :)

In reply to by उडन खटोला

ह्या धाग्यावरचे श्री.बोका यांचे दोन प्रतिसाद आक्षेपार्ह होते.ते बहुतेक आता दिसत नाहीयत. (पूर्ण धागा पुन्हा स्क्रोल क्रून बघण्याइतका पेशन्स नाहीय.) इतरत्रही राजकीय धाग्यांवर आणि उजव्या मतांच्या बाबतीत ते अतिशय आक्रमक असतात. मी आक्रमक हा सौम्य शब्द वापरला आहे. बाकी त्यांचे इतर ललित लिखाण अत्यंत वाचनीय असते हे निर्विवाद. त्यामुळे त्यांचे माझ्यासकट अनेक चाहते इथे आहेत. तसेच श्री मुटे यांच्या शेतीविषयक इतर धाग्यांवर काही ठराविक आठदहा लोक; (सर्व मिपा नव्हे; आणि हे मुटे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.)ज्याला ते झुंड म्हणतात त्यांनी अतिआक्रमक, टवाळखोर विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत. मला वाटते की या धाग्यावर अनेक प्रतिसाद उडवण्यात आलेले असावेत. धाडकन एखादा आय्डी उडवला असे बहुधा होत नसावे. संपादकांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. उलट उजव्या आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रतिसादांबाबत थोडी लीनियन्सीच (उदारपणाच) दाखवली जाते असे म्हणता येईल. त्यामुळे इथे तक्रार करण्याजोगे असे काही वाटले नाही. शिवाय हा निर्बंध तात्पुरता असतो. त्यामुळे श्री बोका यांच्या ललित लिखाणाला आपण सर्व मुकणार नाही याची खात्री आहे.

In reply to by पिलीयन रायडर

खरेच बोका भाऊ लवकर परत येवोत हीच इच्छा आहे :/ माझ्या मते कारवाई दोन्ही बाजूनी व्हायला हवी होती करायचीच होती तर. बोका भाऊंनी त्यांना मनोरुग्ण वगैरे म्हटले आहे पण मुटेकाकांनी पण सगळ्यांची अक्कल, दानत काढली आहे.आणि वरून कविता, गझल समजण्यासाठी कशा भावना, संवेदन वगैरे लागतात आणि त्या कशा आमच्यापाशी नाहीयेत हे पण म्हटले आहे त्यामुळे कारवाई झालीच तर ती दोन्ही बाजूने व्हावी नाहीतर बोक्या भाऊंवरचा बॅन उठावा अशी माझी संपादक मंडळाला विनंती आहे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

सहमत पण आता मिपाने जरी बन्दी उठवली तरी इतका अन्याय झाल्यावर बोकाभाउ तरी तयार होतील का पुन्हा यायला?