✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

ध — धनंजय, गुरुवार, 11/29/2007 - 09:33

प्रतिक्रिया द्या
23236 वाचन

💬 प्रतिसाद (32)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/29/2007 - 09:44 नवीन

कोरड पांघरते !!!

क्या बात है धनंजय !!!!!! हृदयविकाराविषयी संशोधन करता करता, असले शब्द तुमच्या मेंदूला स्फुरतात, ह्याचे किती कौतिक करावे तेवढे थोडेच.... सूर्य उगवला दवाची उठलेली वाफ कोरड पांघरते क्या बात है !!!!! - (दिगभ्भांपाठोपाठ धनंजयचा मेजर फ्यान) सर्किट
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 09:52 नवीन

सुंदर

तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची या पेक्षा जास्त शब्दांची गरज वाटत नाही. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. हा काव्यप्रकार तरी सुटला म्हणायचा प्रेमभंगविरांच्या तावडीतून. अभिजित
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 11/29/2007 - 10:32 नवीन

सुरेख

निरभ्र निळे नभ भगभगते मृद्गंध उठला (अजून एक फ्यान्) मनिष
  • Log in or register to post comments
क
किमयागार (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/29/2007 - 10:41 नवीन

कविराज, शब्

कविराज, शब्द त्रिकुटे थोडीशी आतून आलेली न वाटता मेकॅनीकल वाटली इतकी माफक तक्रार सोडली तर कलेचा तुम्ही अतिशय उच्च अविष्कार घडवला आहे. तिकडे तत्वांना गद्ध्याच्या **त सारुन ढोंगी राजकारण खेळणारे बेगडी राजकारणी आणि त्यांची प्यादी, अपशब्द चिखल फेकाफेकी आणि मी पणाचा असह्य दर्प मारणारे 'सो कॉल्ड' तंत्रज्ञ आणि त्यांचे फॅनक्लब ह्या सगळ्या गदारोळात आपला पांढरा शुभ्र स्वच्छ शर्ट तुम्ही भट्टीतून आणल्यासारखा सुरकुत्या विरहीत कसा काय ठेवता बुवा? -कि'गार **************************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 11/30/2007 - 07:35 नवीन

काही भाग थोडे मोजून बेतशुद्ध आहेत हे खरे

एकच उत्तम हायकू लिहायला (आणि एक लिहून झाल्यावर थांबायला!) आध्यात्मिक पोच लागते. म्हणजे वर्षांच्या विचाराचा अर्क अल्पाक्षरात, पण उत्स्फूर्त असा सांगावा लागतो. इथे संच बनवणार असे आधी ठरवल्यामुळे काही थोडी कडवी उत्स्फूर्त आहेत, आणि काही त्या अनुषंगाने विचाराअंती रचलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ओतीव पेक्षा घडीव आकृती दिसते. अभिप्रायाबाबत धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किमयागार
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 11:10 नवीन

मातीचे मोती

मातीचे मोती जियो धनंजय जियो !! अत्यंत सुंदर कल्पना, नवीन आहे. अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. अगदी खरे. धनंजयराव, मानले बुवा तुम्हाला, ते आधी केलेले क्लिष्ट गोष्टीचे भाषांतर अन आता ही हायकुची मेजवानी !! धन्यवाद. (धनंजय फ्यान क्लबात सामील) प्रसाद मुळे ता.क. आमच्या जापानी जाणकार गँगला ही लिंक पाठवायला विसरलो नाही :)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 11:10 नवीन

सुरेख

ऊन धुळीत थेंब चुरचुरून वाफ झालेले मातीचे मोती अप्रतिमच! (धनंजयांचा सर्वात जास्त फ्यान) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:17 नवीन

धन्याशेठ,

तुझ्या प्रतिभेला दंडवत रे बाबा! फारच सुंदर आणि कल्पक लिहिलं आहेस.. तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा मिसळपावला अभिमान वाटतो...! अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:18 नवीन

+१

अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) सहमत आहे . म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:30 नवीन

अरे बेसनाच्या लाडवा,

म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) अरे बेसनाच्या लाडवा, मिसळपाव दर्जेदारच आहे तेव्हा त्यात वेगळं काय वाटायचंय? :) ते जर दर्जेदार नसतं तर तिथे तुझ्यासारखी, धन्याशेठसारखी प्रतिभावान लोकं आलीच नसती! काय खरं की नाही? :) हां परंतु या संस्थळाचं नांव 'मिसळपाव' असल्यामुळे इथे काहीच वर्ज्य नाही. भल्याबुर्‍याची, दर्जा-दर्जाहीनतेची ही एक मिसळच आहे! :) असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
आ
आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 11:33 नवीन

हम्म

असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:41 नवीन

येथेही +१

आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) --- बघताना आकाराने तिरके तिरके चालतील हो ;) पण 'तिरके' नकोत ;) ('तिरका')बेसनलाडू कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. --- सहमत. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सहज गुरुवार, 11/29/2007 - 11:48 नवीन

वाह!

ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली. अगदी मनमुराद चिंब भिजवले गेलो तरी देखील... सुरेख!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:34 नवीन

अप्रतिम

हायकू. डी. एफ. सी. (धनंजय फॅन क्लब) मध्ये मीही सामील :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 14:42 नवीन

धनंजय पंखा परिवार

मी आणखी एक सदस्य... मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) उत्तम हायकूमाला...
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 11/29/2007 - 21:25 नवीन

अगदी असेच

मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) (डी.एफ्.सी लाईफ मेंबर) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/29/2007 - 18:49 नवीन

हायकु.....मस्त !

धनंजयराव, हायकु आवडले. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 11/30/2007 - 01:02 नवीन

आवडल्या.

मस्त. आवडल्या हायकू.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 11/30/2007 - 07:24 नवीन

एकदम भारावून

अहो इतके नका हरभर्‍याच्या झाडावर चढवू! पुढचा प्रयोग पडला की सरासरी पुन्हा मध्यावर येईल :-) पण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो हे मात्र नक्की. मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/30/2007 - 07:49 नवीन

पण आपले संशोधन विसरू नका !

धनंजय, आमच्या अभिप्रायाने आपला साहित्यिक उत्साह वाढतोय हे खरे. पण आम्हाला येत्या पाच-दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात आम्ही दगावलो, तर ह्या उत्तेजक प्रतिसादांना आम्ही दोष देणार हे नक्क्की ! नरकातून काहीतरी स्फोटक लिहू मिसळपावावर (नाहीतरी इथले *** सदस्य नरकातच असतील, तेव्हा)! कारण ह्याच उत्तेजक प्रतिसादांमुळे आपण *आमच्या* हृदयाविषयी संशोधन रहित करून असे हायकू/भषांतरे/व्याकरणविषयक लेख लिहीत बसणार, आणि एल डी एल कमी करण्याच्या पद्धतींविषयीचे आपले संशोधन कमी करणार. ह्या हायकूंनी फार फार तर आमच्या मनाला बरे वाटते. पण आम्ही जगलोच नाही तर कोण आपले हाय्कू एन्जॉय करणार ? तेव्हा आमच्या जनुकांचा आमच्या एल डी एल चा संबंध, ह्या संशोधनात पूर्ण वेळ घालवा. हायकू काय आम्ही पण करू. धनंजय रावांचे हृदय संशोधन संपले आणि आमचे हृदय निकामी कसे आहे ?? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ग
गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:16 नवीन

अप्रतिम

असे अजून हवे! हे हायकू परत एकदा वाचून मस्त वाटले... अधिक लेखनाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 12/09/2010 - 10:28 नवीन

भावगर्भ साक्षात्कार - पुढची पायरी

हायकू (अनेकवचन माहीत नाही...) आवडली. धनंजयनी म्हटलं आहे की
वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात.
याही पुढची पायरी मला दिसते. ती म्हणजे काही हायकूंच्या संगमांतून नवीन हायकू तयार होतात. उदाहरणार्थ - लाल धूळकण दवाची उठलेली वाफ मृद्गंध उठला सूर्य उगवला नभ भगभगते भर वैषाखात ऊन धुळीत थेंब दवाची उठलेली वाफ मातीचे मोती ऊन धुळीत थेंब वाहातायत सैरभैर मृद्गंध उठला तापली धूळ, बसून कोळपली पालवी वाफवून कोरड पांघरते सूर्य उगवला पानावर नक्षी दिसते तसा जड नाही तो अशा तयार केलेल्या सर्वच हायकूंमधून भावगर्भ साक्षात्कार होईलच असं नाही. पण काहींमधून होतो हेच अचंबित करणारं. लाजवाब.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 12/09/2010 - 10:37 नवीन

मानल!

मानल बुवा घासकडवी साहेबांना! अन हो धनंजयांचा तर अतिशय स्त्युत्य प्रयोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 10:47 नवीन

भारीच की राव!

झकास राजेशराव! मस्त जमले आहेत, प्रयोग आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
क
कवितानागेश गुरुवार, 12/09/2010 - 11:13 नवीन

मस्त

फार वर्षांनी हायकू वाचायला मिळाले. छान वाटलं. तुमच्यासाठी धन्यवादाचा हायकू: लालबुंद तर्री गरमगरम मिसळ शेव ओली पाव ओला
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/09/2010 - 15:10 नवीन

बावनकशी सोनं! भारीच! आपणही

बावनकशी सोनं! भारीच! आपणही 'डीएफसी'चं सदस्यत्व घेतलेलं आहे ब्वॉ.
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 06/09/2016 - 11:03 नवीन

छान हायकू आहे.

हायकू विषयी गुगलवताना आपल्या मिपा वरील हा धागा सापडला. खूप सुंदर!
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:28 नवीन

ता क

कोणाला हायकू मध्ये रस असेल अथवा जाणून घ्यायचे असेल तर ह्या लिंक्स वाचाव्या. गुगलवून मिळवल्या आहेत. कष्टाने शोधल्या म्हणून वाटलं इतरांना पण फायदा होऊ दे. आवड नसल्यास दुर्लक्ष करावे. हाकानाका. :) (जमतंय की मिपा भाषेत लिहायला) http://mumbaitarunbharat.in/Encyc/2016/1/23/‘हायकू-.aspx#.V1kMlkThUwg http://www.mr.upakram.org/node/2342
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/09/2016 - 12:35 नवीन

vaakhusaaaa.

vaakhusaaaa.
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:40 नवीन

बाप रे

ती लिंक ब्रह्माण्ड व्यापायाला गेली. पूर्वपरिक्षण केलं नव्हतं मी गडबडीत. हायकू लेख तरुण भारत आणखी एक लेख आत्ता होईल नीट अस वाटतंय. गोंधलाबद्दल माफी असावी.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 06/09/2016 - 17:17 नवीन

उल्का तुम्ही फार सुंदर धागा शोधुन काढलात

काय सुंदर धागा आहे. अनेक दिवसांच्या रखरखीत कोरड्या जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तस वाटल. आणि आजच्या जुन महीन्यातल्या दिवसात कसला मॅच झालाय धागा. धनंजय मराठी संस्थळावरील असामान्य प्रतिभेचा माणुस आहे. अशी प्रतिभा दुर्मिळच ही उल्का अशीच कोसळत राहो.
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 06/09/2016 - 17:36 नवीन

धन्यवाद!

धन्यवाद! तरुण भारतचा लेख जरुर वाचा. आणि हा पण एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा