Skip to main content

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 06/05/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
..तुला पाहण्याचा मला छंद राणी.. दिव्यांना नको तू करु मंद राणी तुला पाहण्याचा मला छंद राणी पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी मला घे मिठीच्याच कैदेत आणि नको गे करु तू खुले बंध राणी तुला मी मला तू असे प्राशवावे.. पुरी रात व्हावी मधू धुंद राणी.. तुला लागला सावळा रंग माझा तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी - कानडाऊ योगेशु

वाचने 2856
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

प्रेम-गझल आवडली! Sandy

एका प्रेमकाव्याची... उन्हाळी (रखरखीत) धाग्यात अवकाळी पाऊसकळा