Skip to main content

पहाट बोले …

लेखक उल्का यांनी शनिवार, 30/04/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
आली पहा ती रम्य पहाट पक्षी करिती किलबिलाट कोकिळ घाले मधुर साद; केशर रंगी रविकिरणे शीतलता ही प्रसन्न करे पर्णांना सोनेरी वर्ख चढे; दावुनी अपुली किमया ही काय सांगू पाहते ती? “हार नका मानू कधी!” “तम हा सरला, उठा सारे, चैतन्याचा प्रकाश पसरे, कर्तृत्वाचे रचा मनोरे!” – उल्का कडले
लेखनविषय:

वाचने 1170
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया