किती कोसावर कोनाची कहानी बदलते
नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते
कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा?
बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते
तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते?
इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते
उधारीची जिनगी जगला तई थो समजला
उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते?
इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा?
निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते
* कई = कधी
* थो = तो
* चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.
प्रतिक्रिया
25 Apr 2016 - 7:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषेसहित गझल आवडली.
-दिलीप बिरुटे
25 Apr 2016 - 11:10 am | प्रचेतस
+१
25 Apr 2016 - 11:12 am | कैलासवासी सोन्याबापु
खल्लास बे स्वाम्या! खासच जमले हे काम! :)
25 Apr 2016 - 11:13 am | पिलीयन रायडर
आवडली.
ही बोली मला आवडलीच आहे फार. ती बोलीच छान आहे म्हणुन की तुम्ही छान लिहीता म्हणुन ते नक्की माहिती नाही. :)
26 Apr 2016 - 6:44 am | स्वामी संकेतानंद
बोलीच छान आहे. सगळ्याच बोली छान असतात. :)
25 Apr 2016 - 12:05 pm | रातराणी
मस्त! आवडली!
25 Apr 2016 - 12:33 pm | पैसा
मस्त!
25 Apr 2016 - 1:09 pm | नीलमोहर
बोली भाषेतील लिखाण मनाला नेहमीच स्पर्शून जाते.
25 Apr 2016 - 1:19 pm | चांदणे संदीप
झाडीबोलीने अगदी झाडून टाकले! कस छान दिसतंय मिपांगण! :)
Sandy
25 Apr 2016 - 1:23 pm | एस
मला पूर्ण समजली नाही पण आवडली.
26 Apr 2016 - 2:12 pm | पथिक
लय भारी भौ ! भलकशी आवडली !! इदर्भातले दिस्ता ?!
26 Apr 2016 - 4:18 pm | बोका-ए-आझम
हे मस्तच! बोलीभाषेतली गझल हा प्रकार भारी आहे.