किती कोसावर कोनाची कहानी बदलते
नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते
कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा?
बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते
तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते?
इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते
उधारीची जिनगी जगला तई थो समजला
उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते?
इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा?
निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते
* कई = कधी
* थो = तो
* चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2125
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
+१
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खल्लास बे स्वाम्या! खासच जमले
आवडली.
बोलीच छान आहे. सगळ्याच बोली
In reply to आवडली. by पिलीयन रायडर
मस्त! आवडली!
मस्त!
छानच..
मस्तच!
मला पूर्ण समजली नाही पण आवडली
लय भारी भौ ! भलकशी आवडली !!
इस्यारा समजन का थो पारधी,