Skip to main content

चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 13/04/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 तुज्या वीन राहु कसा गीत हे गाऊ कसा स्वप्न हे पाहू कसा तुज्याच प्रीतीचे काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 भास सारे हे छळती भाव मजला न कळती साद का ऐकू येते सांग ना रे...... का कुठे मी हरवतो मीच मजला मिरवतो चाहुली का पुन्हा या सांग ना रे परतुनी ये तू ग पुन्हा... सांग वेडे माझा गुन्हा ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी... आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला सजणी ग.... जिव माझा आतुरला ध्यान नाही माझे मला... ऐकुदे....मज पुन्हा...आज प्रेमाची कथा...
लेखनविषय:

वाचने 2377
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न) कोणता चित्रपट? सिच्युएशन काय आहे? त्याच्या आधी व नंतर काय होते? गीताच्या चित्रिकरणात काय होते?

In reply to by तर्राट जोकर

आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला

क्या बात है...! दाटी वाटी, छळती कळती, पुन्हा गुन्हा, वारा गारा, करुदे धरुदे... एकापेक्षा एक सरस. येउं द्या अजून.

In reply to by प्रचेतस

"लिफ्ट" न मिळाल्याने करावी लागणारी मजल दरमजल आहे काय? कारण आजकाल प्रेमातही "लिफ्ट " (कधीमधी गिफ्ट) मिळू शकते असे पोपशास्त्रींचे म्हणणे आहे. पोपवचन नितवाचक नाखु

आज बेधुंद वारा साथीला गार गारा ओ भौ भाइर गारा पडतायत....टकुर फुटल ना र बाबा.

In reply to by होबासराव

स्वारी, वारा ला यमक लागलं नाही म्हणुन गारा टाकल्या. हे बघा कसं वाटतंय? आज बेधुंद वारा कढईत गरम झारा किंवा आज बेधुंद वारा निवृत्त झाला लारा किंवा आज बेधुंद वारा आकाशी एक तारा ( हायला, हे जमलं की चूकून ;-))

In reply to by तर्राट जोकर

१. आज बेधुंद वारा साथीस पाऊसधारा २. आज बेधुंद वारा मज तूच किनारा ३. आज बेधुंद वारा प्रितरंग हा न्यारा ४. आज बेधुंद वारा बोल तुझा मज प्यारा ५. आज बेधुंद वारा खुला आसमंत सारा ६. आज बेधुंद वारा सहवास तुझा प्यारा ७. आज बेधुंद वारा विसरु ज़माना सारा इ.

आज बेधुंद वारा वाढला उन्हाचा पारा येऊ दे पावसाच्या धारा . . . [ पुढे काय बरे ? हं ' आठवले ' ] चला आता घरी जाऊ .

आज बेधुंद वारा वाढला उन्हाचा पारा येऊ दे पावसाच्या धारा मग बसु घेउन व्हिस्कि आणि खारा