परी
लेखनविषय:
मला वृत्तांविषयी फारशी माहीती नाही परंतु ही कविता अक्षरगणवृत्तामध्ये येते का हे जाणकारांनी सांगावे.
अतुल्य सुंदर
अवखळ बाला
हरखुन सारे
पाहितसे॥
केसांत फुलांची
सजवुन माला
हृदयीच घाला
घालितसे॥
परी तरंगत
अलगद चाले
फिरती नयनी
मोरपिसे॥
हृदयी परीची,
ओढ अनावर
बंध भावनेस
घालु कसे॥
पाहुन मजला
हळुच हसली
मनात बिजली
कोसळते॥
अलगद जाई
धुक्यात विरुनी
या आठवणी की
स्वप्न असेे॥
आशिष...
वाचने
1792
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान लयीत बसणार्या ओळी आहेत..चांगली दोन-तीन कडवी होऊ शकतील खरे तर.. पण अभंगासारख्या पद्धतीने लिहिण्याचे कारण समजले नाही.. असो. पुलेशु.
राघव
In reply to छान लयीत बसणार्या ओळी आहेत. by राघव
धन्यवाद! :)
मला ६-६-६-४ अशा शब्दरचनेमध्ये लिहुन पहायच होत म्हणुन अशी लिहीली बाकी काही नाही! अशी रचना फक्त अभंगांसाठीच वापरली जाते का?
In reply to धन्यवाद! :) by शब्दबम्बाळ
अच्छा.. मग ठीक आहे..
साधारणपणे ६-६-६-४ अशा रचनेत ते एकेक कडवे असल्यासारखे असते. इथे तसे नाही.. म्हणून विचारले.
चांगलीय
छान
अतुल्य सुंदर
अवखळ बाला
हरखुन सारे
पाहतसे॥
केसांत फुलांची
सजवुन माला
हृदयी घाला
घालितसे॥
परी तरंगत
अलगद चाले
फिरती नयनी
मोरपिसे॥
हृदयी परीची,
ओढ अनावर
बंध भावना
घालु कसे॥
पाहुनि मजला
हळुच हसली
मनात बिजली
कोसळते॥
अलगद जाई
धुक्यात विरुनी
आठवणी की
स्वप्न असेे॥
आता बसते चालीत बघा...
रचना उत्तम आहे....
नो वरीज....
In reply to अतुल्य सुंदर by विजय पुरोहित
खुप आभार! :)
वर म्हटल्याप्रमाणे केवळ अक्षरसंख्येकरता आलेली काही अक्षरे लय तोडत होती हे जाणवले! :)
हीच कविता जरा चित्र रुपात सादर करतो! :)

मस्त रचलीये...
छान लयीत बसणार्या ओळी आहेत.