परी

शब्दबम्बाळ जे न देखे रवी...
मला वृत्तांविषयी फारशी माहीती नाही परंतु ही कविता अक्षरगणवृत्तामध्ये येते का हे जाणकारांनी सांगावे. अतुल्य सुंदर अवखळ बाला हरखुन सारे पाहितसे॥ केसांत फुलांची सजवुन माला हृदयीच घाला घालितसे॥ परी तरंगत अलगद चाले फिरती नयनी मोरपिसे॥ हृदयी परीची, ओढ अनावर बंध भावनेस घालु कसे॥ पाहुन मजला हळुच हसली मनात बिजली कोसळते॥ अलगद जाई धुक्यात विरुनी या आठवणी की स्वप्न असेे॥ आशिष...
वर्गीकरण
लेखनविषय:

9 टिप्पण्या 1,792 दृश्ये

Comments

राघव नवीन

छान लयीत बसणार्‍या ओळी आहेत..चांगली दोन-तीन कडवी होऊ शकतील खरे तर.. पण अभंगासारख्या पद्धतीने लिहिण्याचे कारण समजले नाही.. असो. पुलेशु. राघव

शब्दबम्बाळ नवीन

In reply to by राघव

धन्यवाद! :) मला ६-६-६-४ अशा शब्दरचनेमध्ये लिहुन पहायच होत म्हणुन अशी लिहीली बाकी काही नाही! अशी रचना फक्त अभंगांसाठीच वापरली जाते का?

राघव नवीन

In reply to by शब्दबम्बाळ

अच्छा.. मग ठीक आहे.. साधारणपणे ६-६-६-४ अशा रचनेत ते एकेक कडवे असल्यासारखे असते. इथे तसे नाही.. म्हणून विचारले.

विजय पुरोहित नवीन

अतुल्य सुंदर अवखळ बाला हरखुन सारे पाहतसे॥ केसांत फुलांची सजवुन माला हृदयी घाला घालितसे॥ परी तरंगत अलगद चाले फिरती नयनी मोरपिसे॥ हृदयी परीची, ओढ अनावर बंध भावना घालु कसे॥ पाहुनि मजला हळुच हसली मनात बिजली कोसळते॥ अलगद जाई धुक्यात विरुनी आठवणी की स्वप्न असेे॥ आता बसते चालीत बघा... रचना उत्तम आहे.... नो वरीज....

शब्दबम्बाळ नवीन

In reply to by विजय पुरोहित

खुप आभार! :) वर म्हटल्याप्रमाणे केवळ अक्षरसंख्येकरता आलेली काही अक्षरे लय तोडत होती हे जाणवले! :)