मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द

विश्वव्यापी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची ! शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द

वाचने 3594 वाचनखूण प्रतिक्रिया 20

विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 19:34
शब्दांनी शब्द रेखा शब्दांच्या , शब्दांनीच शब्द उणे शब्दांना शब्दांनीच शब्दांची शब्द भरारी ,शब्दांनीच शब्दांची किंमत शब्दांना
शब्दबंबाळ शब्दबंबाळ शब्दबंबाळ :-)

चांदणे संदीप Wed, 12/02/2015 - 19:49
शब्दांना वाहिलेली की शब्दात वाहून गेलेली कविता? :-/ यावरून एक चारोळी आठवली: येते तिची आठवण केली आठवणींची साठवण साठवूनी आठवण केली तिची पाठवण! (ही माझीच आहे - दहावीनंतर कॉलेजच्या सुरुवातीला केलेली! टीप: यवारून माझ्या तत्कालीन स्थितीविषयी उगीच कसलाही अर्थ लावीत बसू नये!) ;-) Sandy

In reply to by चांदणे संदीप

विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 20:24
शब्दांचे महत्व सांगणारी कविता ! तुम्ही शब्दांचे अर्थ घट्ट पकडले तर वाहून जाणार नाही . :-) बाकी प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . लोभ असावा . चूभूद्याघ्या :-)

पैसा Fri, 12/25/2015 - 12:13
ही कविता वाचायच्या आधीच दुसर्‍या लेखावर प्रतिसाद दिला होता! =))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वव्यापी Sun, 12/27/2015 - 12:45
बिरूटे साहेब, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खुप आभारी आहे. आपणांस कविता बरी वाटली हे पाहून आनंद झाला. Thank you विश्वव्यापी