✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 11/26/2015 - 14:34
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी विशाल (२६-११-२०१५)

प्रतिक्रिया द्या
4081 वाचन

💬 प्रतिसाद (20)

मस्त! आवडली!!!

मांत्रिक
गुरुवार, 11/26/2015 - 14:54 नवीन
मस्त! आवडली!!!
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 11/26/2015 - 15:22 नवीन
खूप छान!
क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी
अतिशय आवडले!
  • Log in or register to post comments

_/\_

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 15:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 15:53 नवीन
  • Log in or register to post comments

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 15:54 नवीन
  • Log in or register to post comments

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 15:54 नवीन
  • Log in or register to post comments

नव्या-जुन्या किती खुणा

पालीचा खंडोबा १
गुरुवार, 11/26/2015 - 16:21 नवीन
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी खुपच सुरेख अगदि मनतुन आलेलि वाटते खोलातुन
  • Log in or register to post comments

आवडली गझल...!

रुमानी
गुरुवार, 11/26/2015 - 16:47 नवीन
आवडली गझल...! उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी ह्य दोन ओळी खासच.....!
  • Log in or register to post comments

संपादक मंडळी, माझ्या

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 18:16 नवीन
संपादक मंडळी, माझ्या प्रतिसादांचा काय गोंधळ झालाय बघणार का? उडवलेत तरी चालेल. फ़क्त मतल्यात 'आन्दणात' ऐवजी 'आंदणात'असा बदल करा कृपया.
  • Log in or register to post comments

वा!

दमामि
गुरुवार, 11/26/2015 - 19:06 नवीन
वा! आजच्या तारखेचा विशेष संदर्भ आहे का?
  • Log in or register to post comments

हो दमामि, विशेषत: शेवटचे

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 21:32 नवीन
हो दमामि, विशेषत: शेवटचे दोन्ही शेर २६-११ चा सन्दर्भ घेवून आलेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अगदी समयोचित!

दमामि
Fri, 11/27/2015 - 12:37 नवीन
अगदी समयोचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मस्त गझल

मित्रहो
गुरुवार, 11/26/2015 - 19:07 नवीन
क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी
खासच
  • Log in or register to post comments

क्या बात है जी!!!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 19:15 नवीन
क्या बात है जी!!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी _/\_

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 11/26/2015 - 21:34 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments

छान आहे!

एस
गुरुवार, 11/26/2015 - 22:11 नवीन
खूप कमी बोलणारी आणि बरेच काही सांगून जाणारी कविता आवडली!
  • Log in or register to post comments

झकास विकु

चाणक्य
Fri, 11/27/2015 - 11:28 नवीन
सुरेख झालीये गझल. एकदम कडक. फक्त दुस-या शेरातल्या दुस-या मिस-यात जरा मीटर गडबडलय का? (का मलाच तसं वाटतंय) म्हणजे तांत्रिकदृष्ट्या दोन 'ल' चा 'ग' होऊ शकतो. पण वाचताना गाडी अडखळतीये असं मला वाटलं. असा बदल केला तर:- किती पडाव सोडतो ईथे क्षणाक्षणात मी
  • Log in or register to post comments

गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट

विशाल कुलकर्णी
Tue, 12/01/2015 - 10:25 नवीन
गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट घेण्याची परवानगी आहे. एका गुरु च्या ऐवजी दोन लघु , वृत्त बदलत नसेल तर चालतात. आता राहिला बदलतो च्या ऐवजी सोडतो चा वापर तर त्यामुळे शेराचा अर्थच बदलेल. ही सुट घेण्यापुर्वी मी गझलकारा क्रान्ति साडेकरांकडून खात्री करून घेतलेली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ओक्के

चाणक्य
Tue, 12/01/2015 - 21:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सुन्दर शब्दरचना

शान्तिप्रिय
Wed, 12/02/2015 - 17:28 नवीन
सुन्दर शब्दरचना
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा