Skip to main content

<विखुरलेला चखणा>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/09/2015 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा www.misalpav.com/node/32919 हल्ली कमीच झालंय माझं बारमध्ये जाणं गेलोच तर हरपुन जात हळुहळु दुनियेचं भान. हल्ली कमीच झालंय तसं रात्र रात्र तळमळणं, मला बघुन मालकानं कमी केलयं उधाऱ्या देणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोगराबाईनं खुणावणं, तिलाही झालंय सवयीचं गुपचूप पाकीट मारणं. हल्ली कमीच झालंय घरी ऊशिरा येणं. मलाच कसं नाही जमलं असं अवेळी लवकर येणं. हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच, तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चखण्याच? (वोडका का रम काय सुचना)
लेखनविषय:

वाचने 4542
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

शेवटच्या कडव्यात जरा यमकाचा घोळ झाला आहे
हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच, तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चाखण्याच?
असे चालेल का ? ..कविता मस्त. या बदला नंतर मग कवितेला "विखुरलेला चखणा" हे नाव चालेल का ? पैजारबुवा,

रम हाय का वोडका हाय? जी आसन ती आना. गळा सूक्लाय तर कै सूचना बगा. बम भोले. बाबा योगिराज की जय हो.

बाटली म्हणून पार्सल खोलले तर नुसताच चखणा निघाला. आता प्यायचे काय? आरं कुटं नेऊन ठिवली बाटली माझी?

In reply to by एस

च्यायला, हापेक्षांच वझं चागलचं वाढलयं आता.:) जिलबी पण तिखटमीठ लावुन चांगली परतुन आन् फोडणी देऊन मगच वाढत जाईन.:)