Skip to main content

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

Published on सोमवार, 07/09/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 3459
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ या ओळी आवडल्या अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्‍यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.

In reply to by माहितगार

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते. धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)

_/\_

अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ आवडली