Skip to main content

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
फसवले काळासही मधुमास होते भोगले जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला जानकीने का इथे वनवास होते भोगले ? दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली यार, फसलेले किती अदमास होते भोगले वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ? स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास रदीफ़ : होते भोगले विशाल
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1733
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वाह विशाल राव मतला मस्त जमलाय एकुणात खास गझल

In reply to by महासंग्राम

आणि खाली रदीफ आणि काफिया ची माहिती दिल्याने टेक्निकली पण समजण्यास सोपी