सळसळते मनात काही
सल हलकासा जागवी
थरथरती पापण्यां वरती
अश्रुंचे ओले मोती |
त्या गूढ जलाशयावरी
तरंग हळू उमटती
जे खोल अंतरी काही
अनामिक उमगत नाही |
मेघ नभी दाटती
कडकडती त्या दामिनी
-हुदयात या धुमसती
आवेग अनावर किती ?
उसळते धूळही वरती
दशदिशा कोंदून जाती
पाचोळा वाटेवरती
पाउल रोखिते धरती |
बंध कसले बांधती?
प्राणांस कसली भिती ?
जोडण्या ईश्वरापुढती
हे हात न माझे उरती |
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2583
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
कविता ठीक
कविता आवडली.