मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस

सटक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे ! निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !! सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे ! अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !! जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे ! लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !! बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे ! धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !! या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे ! जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!

वाचने 1681 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by अत्रुप्त आत्मा

सटक Wed, 06/24/2015 - 23:48
धन्यवाद. आवेग हा पावसाचा आत्मा आहे असे माझे मत आहे. सुरुवातीला सतत जाणवणारा आवेग त्रुप्तीकडे जाताना शांत, संयत होताना बघायला फार छान वाटते.