रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे !
निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !!
सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे !
अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !!
जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे !
लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !!
बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे !
धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !!
या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे !
जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1689
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
धन्यवाद !
In reply to छान! by पैसा
कवितेच्या मांडणी मधला आवेग
धन्यवाद. आवेग हा पावसाचा
In reply to कवितेच्या मांडणी मधला आवेग by अत्रुप्त आत्मा
स्पष्टीकरणा बद्दल, धन्यवाद..
In reply to धन्यवाद. आवेग हा पावसाचा by सटक
आवडली!
मस्त मस्त मस्त
ज्जे ब्बात ! जियो...
क्या बात ! नुसताच आवेग नाही,
सर्वांना धन्यवाद! हुरूप आला!