Skip to main content

राती आभाळ रडलं

लेखक अनिल भारतियन यांनी गुरुवार, 21/08/2008 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं जीर्ण न शीर्ण वसन काजळले माझे सदन वटवॄक्ष मायेचा वठला झरा वाळवंटी आटला या नीरव रेतीमधले टोचतात निवडूंगी भाले मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! अनिल
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1940
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुरवातीला...... राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं नंतर पुढे...... या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! टायमींग प्रॉब्लेम वाटला.

कविता आवडली. अजुन येउद्द्या अनिल भारनियमन राव.

कविता. अजून येउद्यात.