शामसुंदर घननिळा......
लेखनविषय:
काव्यरस
दारि तुझ्या बैसुनी आहे
होवुन दारिची शिळा
का तरी ना भेटला मज
तु शामसुंदर घननिळा
जातोस तु लिला कराया
गोपिकांच्या सोबती
फोडीसी हंडे दह्याचे
गोपाळ घेउन संगती
जातो कधी समजेच ना
तुज पाहाया मी थांबलो
देउनी सर्वस्व माझे
तव पायरी वरी राहीलो
नाही मी अर्जुन अथवा
नाही मीराबाई रे
अरे मी वेडा पिसा
आलो तुझीया पायी रे
आज मजला भेट थोडा
तुज पाहण्याची संधी दे
वसुनी या नयनात
मजला जन्मांतरीची शांति दे
ये त्वरेने आज आता
जीवज्योत संपत आहे
ह्या तुझ्या भक्ताकडे
बघ काळ थोडा राहीलाहे
थांबलो आहे इथे मी
पाहण्या तुझीया लीळा
दारात ये आता तरी
हे शामसुंदर घननिळा………
वाचने
1250
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
वाह ! सुरेखच !
In reply to वाह ! सुरेखच ! by वेल्लाभट
स्वातंत्र्य वगैरे काही नाही
छान प्रयत्न.
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield