Skip to main content

दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/08/2008 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही. कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो. कधी केनिया बांगलादेशही नडतो. या हरण्याचे कारण उमगत नाही. या हरणे म्हणवत नाही. कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे. त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे. या घोड्याला लगाम शोधीत आहे, आयसीसीला गवसत नाही. तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी. पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी. पराभवाला हजार कारणे देतो. पण कबूल करवत नाही. फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे. मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे. या खेळाला विजयाचाही आता. मेघ पालवत नाही. -- अभिजीत दाते मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही कवी - संदिप खरे
लेखनविषय:

वाचने 2853
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त विडंबन !! (विडंबन प्रेमी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

खरच, खुप छान विडंबन !

मस्त च !!! आवडले बर विडंबन !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आमच्या सगळ्यात आवडत्या गिताचे जबराट विडंबन ... काही गफला झाला असता तर एक नविन घागाच काढणार होतो विडंबकाच्या नावाने.. वाचले ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सुन्दर

In reply to by पावसाची परी

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. .... वेळ जात नाहीये का रे? विडंबन एकदम मजेदार. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

उत्तम.. आवडले... शेवटची ओळ या खेळाला विजयाचाही आता. मेघ पेलवत नाही अशीही चालू शकेल. @टारझन.. चपलख म्हणजे काय?