Skip to main content

अवेळी असे मेघ दाटून येता.....

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 28/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळी असे मेघ दाटून येता जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे. जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे..... कितीदा पडावे, कितीदा वहावे धडे अनुभवांचे किती साठवावे. किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा किती चातकाने मना समजवावे .... पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... अवेळी असे मेघ दाटून येता मनाच्या नभाला जरा आवरावे....
लेखनविषय:

वाचने 4582
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by भिंगरी

तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि'प्त आठवणी दाटून आल्या... :-) (कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)

In reply to by संदीप डांगे

कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)
>>> शत प्रतिशत सहमत! :Happy:

छान लयबद्ध झालीये. आजच लिहीलीत का? आजही अवेळी पाऊस आलाय म्हणून विचारलं.

In reply to by शब्दबम्बाळ

कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच !

सहमत. आवडली कविता. -दिलीप बिरुटे

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मागील काही भू छत्रांच्या गर्दीत ही "शब्दवेल" लई भारी !!!!

पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... ह्या ओळी विशेष आवडल्या.