श्यामसुंदर मुळे सरांचा शब्द-मेध यज्ञ
थेट रात्रीचे नऊ वाजता
हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर
पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात
प्रमाथी,दुरंत,अक्षुन्ण
किंवा ग्रामीणपणे
यंग्राट,अत्रंग,आडभंग
एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र
काही स्त्रिया त्यांच्या शब्दांनी कामोत्तेजित होतात
व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते.
शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील
संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते,
लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता
परत येतो,
एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो"
कॉम्प्युटर बंद करतात,
आणि विजयी मुद्रेने आपल्या वांगणी (चोराची) या गावी
झोपी जातात.
उद्याचा घोडा
मनात
हळूहळू
आकार घेऊ लागतो.
xxx
: मिलिंद पदकी
चेपुवरच्या काही महानुभावांची
शामसुंदर मुळे
अरुण कोल्हटकर आठवले.