Skip to main content

प्रश्न असा की......

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 17/01/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर.. प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे.. प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर.. प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..
लेखनविषय:

वाचने 2664
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

प्रश्न आवडला.

छान रचना!

छान प्रश्न
प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..

प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा..
हे फारच छान !

प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. आवडेश .. एक वेगळी कवी कल्पना म्हणुन जास्त आवडली.. खरेच प्रश्न असेच असले तर ?