मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशांतिचे गाणे... (गीत.)

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(चाल-​ ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है ) होतोच एकटा मी,राहिन एकटा ही मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥ तेथून गार वारा,शिडकावतो मनाही निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना! देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना! वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती? सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥ मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥ सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ बोलावितो मला ही,तो शांत शांत तारा खुणवून दाट आहे,आकाशिचा पसारा म्हणतो खुळ्या अरे का?तू गप्प गप्प राही॥५॥ बोलून टाक सगळे,गेली अशांतता ही............॥धृ॥ https://lh3.googleusercontent.com/-onoRACleFm4/VLAj22RviRI/AAAAAAAAGt8/-EB_xxpQ98Y/w314-h405-no/shukra%2Btara.jpg ============= अतृप्त.. . . . . (प्र.चि. - अं.जा.वरून..)

वाचने 8952 वाचनखूण प्रतिक्रिया 27

कंजूस 10/01/2015 - 07:39
गेय कविता दुर्मिळ होत चालल्या आहेत ?नाही, ही एक पाहा आशयगर्भ. वेरुळालेण्यांत सापडेल का शांती ?डोळे भरून पाहा १ते ३४लेण्यांत.प्रतिभा असतांना शांतीची सवत कशाला पाहिजे ? अप्रतिम बुवा. सोमवारी लेख नको महाकाव्य हवे.

In reply to by मुक्त विहारि

नाखु(न)काका-- हां भावानुवाद नाही.. फ़क्त त्या चालिवारून सुचलेली आहे. मूवी-- तुमची "स्फुर्ती-प्रेरणा" कोण? >>> नेहमीचीच! ;-)

In reply to by टवाळ कार्टा

मराठी व्याकरण विसरलास का बे? तांब्या नेहेमीचा असेल का नेहेमीची? =)) पेर्णा=स्त्रिलिंग (नेहेमीची) तांब्या= पुल्लिंग (नेहेमीचा) =))

hitesh 11/01/2015 - 22:53
छान. आनंदकंद वृत्त. एका तळयात होती बदके पिले सुरेख. चूडी मझा न देगी कंगन मझा न देगा

In reply to by कंजूस

वृत्त तेच म्हटल्यावर चाल बसणारच पण तिच्यातून शब्द-उभे राहिले पाहिजेत..ते काम हितेसभाय म्हणतात त्यातच परफेक्ट होते आहे..म्हणून अनुमोदन त्यासच कायम ठेवत आहे. :)

In reply to by प्रमोद देर्देकर

@बुवा का ब्र शांतीच्या मागे लागले असावेत?>> गाणं नीट वाचल/ऐकलं नैत बहुतेक! ;) अहो सोप्पं आहे..अशांतीच्या शोधासाठी! :)

गणेशा 24/01/2015 - 15:18
सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥ मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥ मस्त एकदम .. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी... --- अवांतर : शांती म्हणे न जेंव्हा काही.. तेंव्हा अशांतीची सुरुवात असेन ती.

पोत्यानी होती गीते, मी श्राव्य शोधताहे हितगूज जे वदे ते, मी गीत शोधताहे शांतीस साक्ष व्हावे, ही आस धरून राही मन हे असेच वेडे, सांगून गूज पाही