अशांतिचे गाणे... (गीत.)
(चाल- ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है )
होतोच एकटा मी,राहिन एकटा ही
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥
तेथून गार वारा,शिडकावतो मनाही
निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही
आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥
शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना!
देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना!
वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥
गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती?
सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी
कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥
मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥
सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो मी
शांतीत काय आहे?,शोधुन भागलो मी
शांती मला म्हणे बा,तू स्वस्थ फक्त राही॥४॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥
बोलावितो मला ही,तो शांत शांत तारा
खुणवून दाट आहे,आकाशिचा पसारा
म्हणतो खुळ्या अरे का?तू गप्प गप्प राही॥५॥
बोलून टाक सगळे,गेली अशांतता ही............॥धृ॥
=============
अतृप्त..
.
.
.
.
(प्र.चि. - अं.जा.वरून..)
=============
अतृप्त..
.
.
.
.
(प्र.चि. - अं.जा.वरून..)
अतिशय सुंदर आणि लयबद्ध.
हेच म्हणतो...
गीता आणि प्रतिभा अं!
गेय कविता दुर्मिळ होत चालल्या
@कंजूस काका >> बाप रे!!!
कूठे चालला आत्मुस?
आता बापरे! नको. फक्त शरणम
चांगलीय !! शांतीवरची कविता !!
अस्सल भावानुवाद.
सुंदर कविता अतृप्त आत्माजी
बुवा मस्त कविता...
नाखु(न)काका-- हां भावानुवाद
नेहमीचीच! >> औं?? तांब्या???
मराठी व्याकरण विसरलास का बे?
ट़का.. बुवांनी ताम्रकलश
.
थँक्यू!!!
लाजून हासणे अन हासून ते
वृत्त तेच म्हटल्यावर चाल
ओह्ह ओक्के!! शांती!!
बुवा का ब्र शांतीच्या मागे
@बुवा का ब्र शांतीच्या मागे
गेयता
सोडून नाद सगळा,ध्यानस्थ बैसलो
सुरेख रचना आहे. आवडली!
व्वाह!!!
अत्रुप्त अशांत आत्मा.