कसं जमतं तुला

सुचेता जे न देखे रवी...
कसं जमतं तुला, मनाला आवरणं? किती सहज, हे तुझ असं विचारणं? उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय मला? थोपवताना भावना घामाघूम जीव आपला तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला? फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ लपवताना थरथर, मन उघडं पडावं जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

19 टिप्पण्या 4,813 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

Yash नवीन

छान आहे. प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय.

पैसा नवीन

मिपावर पुन्हा नव्याने लिहिते झाल्याबद्दल स्वागत! छान कविता! अजून येऊ द्या!

सुचेता नवीन

पैसा ताई ने म्हणल्या प्रमाणे पुन्हा लिह्न्याचा प्रयत्न कर्तेय. यश, प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय, या साठी शेवटच्या ओळी वाचुन पहा. पुनरेकवार सर्व प्रतिसादकर्ते व वाचन्मात्रांचे आभार सुचेता

प्यारे१ नवीन

आवडली. हाल ही में शादी हुई एक नवविवाहीता के अंतर्मन की भावनाओंको बडी खुबसुरती के साथ पेश किया गया है असं काहीसं ;)