कसं जमतं तुला
लेखनविषय:
काव्यरस
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
वाचने
4813
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान लिहीली आहे.
लि हीत र हा.
खूप छान !!
छान आहे. प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय.
मिपावर पुन्हा नव्याने लिहिते झाल्याबद्दल स्वागत! छान कविता! अजून येऊ द्या!
सुचेता तै...मिपावर तुमचे स्वागत
माझ्याकडून हा एक नजराणा :)
कविता छान आहे.
सुरेख आहे कविता!
आवडली.
वाळवंटात हिरवळ ,दंग्यात शांतरस संभाळणं कसं जमतं ?
छान कविता!
समंजस कविता :)
पैसा ताई ने म्हणल्या प्रमाणे पुन्हा लिह्न्याचा प्रयत्न कर्तेय.
यश, प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय, या साठी शेवटच्या ओळी वाचुन पहा.
पुनरेकवार सर्व प्रतिसादकर्ते व वाचन्मात्रांचे आभार
सुचेता
मस्त सुचेता, छान कविता
आवडेश...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climbलिहित रहा गं.आता थांबु नको.छान जमलीये कविता.
आवडली.
हाल ही में शादी हुई एक नवविवाहीता के अंतर्मन की भावनाओंको बडी खुबसुरती के साथ पेश किया गया है असं काहीसं ;)
आवडली.
छानच... लिहीत रहा...
सुचेता छान कविता..
छान