तुझ्यापासून दूर होऊन
अमाप काळ लोटला
दु:ख हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच..
----
आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला
तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं
फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत
जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले
बस्स इतकेच..
----
परवा अलमारी उचकतांना
तुझे एक पैंजण हाताला लागले
छन्न झालं एकदम
आपल्या जोडीदाराअभावी
एकाकी,केविलवाणे वाटले
बस्स इतकेच..
----
तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला
'त्या' तस्बिरीतले
तुझे डोळे
आणि त्या डोळ्यातले ते काजळ..
बघता बघता कां कोण जाणे
टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम
बस्स इतकेच..
----
तुझी आठवण आजही येते
अगदी नित्यनेमाने
काही ठोके चुकतात
परत मार्गी लागतात
बस्स इतकेच..
पण तू गेलीस तेव्हाचे चुकलेले
चुकार ठोके अजुनही परतलेले नाहीत
बस्स इतकेच..
----
हम्म.. दु:ख हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच.. इतकेच...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१०/१२/२०१४)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम !
अप्रतिम !
क्या बात है मिका.
आवडली कविता.
अवांतर : हम्म, खटकतंय. पण चालायचंचं.
-दिलीप बिरुटे
हेच म्हणतो !
In reply to क्या बात है मिका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता अप्रतिम :)
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
मस्त जमलीय. आवडली.
छळ मेल्या छळ!
छळ मेल्या छळ!
आवडली हे वे सां न ल.
मि.का. .... बस्स इतकेच!
मि.का. .... बस्स इतकेच!
छान जमलीय
सुंदर कविता
तुझ्यापासून दूर होऊन
तुझ्यापासून दूर होऊन
अमाप काळ लोटला
दु:ख हलकं नाही झालयं
पण सहन करण्याची ताकद वाढलीये..
बस्स इतकेच..
वाह...क्या बात हयं... :)
मदनबाण.....
आजची बदलेली स्वाक्षरी :- Chamak Cham Cham... { Sitaron Mein Tu Hi :-Yesudas }
+१११११
In reply to तुझ्यापासून दूर होऊन by मदनबाण
मिकाशेठ जियो!!!
एकदम मस्त आहे भावकाव्य
In reply to तुझ्यापासून दूर होऊन by मदनबाण
एकदम मस्त आहे भावकाव्य
मस्त...
परत एकदा, एका संवेदनशील मनातून उतरलेली, जबरदस्त कविता.
(वाचतांना, काही विधूर नातेवाईक, डोळ्यासमोर आले, अन अक्षरेच अंधूक झाली.)
अगदी मनातलं मांडलंत !!
अगदी मनातलं मांडलंत !!
बस्स इतकंच !!
आवडली .
आवडली .
अवांतरः ''इतकेच' ऐवजी 'इतकंच' शब्द अधिक परिणामकारक वाटेल असं वाटतंय.
+१
In reply to आवडली . by आतिवास
+१
सहमत!
In reply to आवडली . by आतिवास
सहमत!
आवडली रे, बर्याच दिवसांनी एक
आवडली रे, बर्याच दिवसांनी एक संवेदनशील कविता वाचायला मिळाली.
मिक्स!!!
मिक्स!!!
फार सुंदर..
फार सुंदर..
क्या बात हे
पेस्शाल मिका टच
चायला हे असले काही वाचले म्हणजे जीव हैराण होतो
असो
एकदम खास उतरलंय
जियो !!!!!
मिका अगदी खरं...
मिका अगदी खरं...
मस्त रे मिका
तुफान झालीये
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम!बस्स इतकंच.
अप्रतिम!बस्स इतकेच.
छे छे..
एवढ्यातच बस्स ?
नो नो अजून येऊ द्या..
मिका रॉक्स,
मिका रॉक्स,
बस इतकेच,
पैजारबुवा,
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या....
याची आठवण आली.
पूर्वी साधारण अशाच अर्थाच्या २ ओळी लिहिल्या होत्या मी,....
खुश थे के खत्म हो गयें, आँसू, आहे, और यादेभी,
कल अचानक लबोंने पुकार लिया, तो चौंक गये।
कविता आवडली.
कविता आवडली.
छान ... आवडली कविता
छान ...
आवडली कविता
सुंदर कविता
अशक्य अशक्य सुंदर कविता आहे
बस्स इतकंच
उत्कृष्ट !!
अत्यंत सुरेख !!