(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.)
थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. कितपत जमलेय ते सांगा.
चणे इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे मधुशालेचे, तो टेबल फसवी माया
नाल्याशी निजलो आपण, नाल्यात पुन्हा उगवाया
तो कोक थंड हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला
होस्टेलच्या वनवासातील, जणू अंगी पदर ओला
स्तोत्रात इंद्रीये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चादणे तुझ्या स्मरणाचे
Enjoy Friday Evening!!
मित्रहो
http://mitraho.wordpress.com
काव्यरस
वाचने
2965
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाल्याशी निजलो आपण, नाल्यात
हे सरता संपत नाही, चादणे तुझ्या स्मरणा
वा!
धन्यवाद
जणू अंगी पदर ओला...
जणू अंगी पदर ओला...
In reply to जणू अंगी पदर ओला... by दिपक.कुवेत
आवडल
कमाल आहे!
ग्रेसफुल विडंबन!
धन्यवाद!
उंदीर आणि बोक्याचे एकमत आहे
In reply to धन्यवाद! by मित्रहो