.....रिप रिप रिप ! !
लेखनविषय:
रिप रिप रिप........
मोड़कळिला आलेले घर
त्या गल्लीतले शेवटचेच,
अजुनही चातक बनुन
चिवटपणे उभे असलेले ,
कालच्या पावसाने पुन्हा एकदा
झोड़पले
पाऊस नेहमी सारखाच....
..........रिप रिप रिप
खिड़कीची धूसर झालेली काच
आधीच तडकलेली.. आता नि:शब्द!
पावसाच्या एक एक थेंबाला
रस्ता दाखवत ती चिर .....कृतार्थ !
जुनाट चौकट भिजलेली...
सगळंच ...
..........रिप रिप रिप
पाउस आणि अंधार सोबतीला
एकटी.... दाराची गंजलेली बीजागिरी,
काळ्या भिंती सावल्या झेलत उभ्या
मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात,
काजळी अंधारातही दिसणारी.....
सगळंच
.............रिप रिप रिप
झाडाची सळ सळ थांबली
अन पाऊसही ओसरला,
चुलीवरले निखारे अजुनही तप्त
इतक्यात कुणी येईल म्हणून.....
दारात कंदील घेउन ती माय उभी !
.....इतक्यात उजाड़ू लागलंय !
........कंदीलही निवलाय !
....सगळंच कसं लख्ख उजळलंय !
पण अजुनही छत गळतंय.....
..........रिप रिप रिप
---------फिज़ा !
वाचने
1332
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता पुनःपुन्हा वाचली
In reply to कविता पुनःपुन्हा वाचली by एस
+++१११ टू स्वॅप्स
कविता आवडली ..