पाऊस आलाय...
पाऊस आलाय
सालाबादप्रमाणे
वेड्या आठवणी जागवायला
पुन्हा-पुन्हा मला लावतोय
माझ्याच मनावर रागवायला
वेडा पाऊस, वेडा...
वेडावणारा पाऊस वेडा
वेड लावतोय, वेडावतोय
कृष्णमेघांच्या सावलीमागून
आतुर होऊन बोलावतोय
भिजायला...
हो...भिजायचंय मलाही...
पण थोडं थांबावं लागेल...
हल्ली असंच करावं लागतं
मनात आलं, तसं वागलं,
मोकळं झालं, असं होतंच नाही...
थांबावंच लागतं
आणि मनालाही थांबवावं लागतं
पण येणार मी, नक्की...
मलाही भिजायचंय ना...
अरे वा!
छान !
नक्की.