Skip to main content

(बेचैन)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/07/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;) गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला' काय मी आता करु? घरचाच मजला हालला आहेच तो आता तरीपण व्यर्थ शब्दांचा तुझ्या का जाच मजला का विडंबन रोजचे असते कपाळी? प्रश्न मेले लाविती बघ आच मजला वायदा सार्‍या कवींचा ज्ञात मजला कायदा हा रोजचा झालाच मजला मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला चैन कवितेची मला करता न आली आहेर असतो रोज, घरचाच मजला चतुरंग
लेखनविषय:

वाचने 5018
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मजा आहे बुवा... आवडले विडंबन. एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला चैन कवितेची मला करता न आली आहेर असतो रोज, घरचाच मजला हे जास्ती छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला अरेरे !!! नवीन काहीच नाही काय कवींच्या कवितेमधे, समस्त कवींनो नुसत्या कविता ओता मिपावर आता, हीच वेळ आहे, क्रांतीची :) बाकी विडंबन झकास !!!

पाताळयंत्री .. मध्ये लय गेली. बाकी ठीक. - (सडेतोड) सर्किट

रंगराव, उत्तरोत्तर रचनांमध्ये सुधारणा दिसत चालली आहे. मात्रापूर्तीसाठीचे भरीचे शब्द/अक्षरे टाळता आल्यास आणखी चांगले होऊ शकेल. काही द्विपदी आणखी स्पष्टही व्हायल्या हव्यात. पण एकंदर छान झालाय प्रयत्न. चालू द्यात. (वाचक)बेसनलाडू

>>एकदा सोडीन म्हटले मी विडंबन >>देती कसे पाताळयंत्री लाच मजला >>चैन कवितेची मला करता न आली >>आहेर असतो रोज, घरचाच मजला ही दोन्ही कडवी लै लै भारी =)) (स्वगतः काउंटर इंटेलिजन्स वापरायला सुरुवात करायला हवी ;) )

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला वा! रंगा, मस्त रे! :)

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला रन्गाशेठ !! लै भारी!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चांगलेच रंग उधळलेत की तुम्ही चतुरंगराव ! भयंकररावांनी काही लिहाव की नाही ! ;) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

:) (स्वगत- मला कधी जमेल असं लिहायला?)

रंगाशेठ, चांगल चलयं.. चालू द्या.. बेलाशेठ आणि सर्किटशेठ च्या सुचनांकडे लक्ष द्या.. पुलेशु.. (निवृत्त)केशवसुमार