तू मोज त्रिज्या,
पण फार आक्रसू नकोस परीघ
असं का बघते आहेस आश्चर्याने
फिरव की तुझा हात पटापट
तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस
नाहीतर मी राहीन घुटमळत
तुझ्यापाशी तो पर्यंत
माझ्याही वहीवर उमटत नाहीत
तुझी अक्षरे जो पर्यंत
चल लवकर मोज व्यास
दे उत्तर चटकन्
उशीर करू नकोस
फार वेळ नाही राहीलाय
कारण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.
काव्यरस
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1717
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कंपासपेटी विसरलेला आणि एक .
अले व्वा चान चान
हम्म!