Skip to main content

'बाळाची शर्यत-' (बालकविता)

लेखक विदेश यांनी गुरुवार, 13/03/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

'
एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1948
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया