२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी
लोकसभेच्या निवडणूकीच्या
जाहीर झाल्या तारखा
काही दिवस तरी कमी होईल
नेत्यांची खा.खा..... :)
----------------------------------------
आधी बोलवत होतो तेंव्हा
केलीत तुम्ही ना ना
तिकडे तिकीट न मिळता
इकडे लगेच आलात ना.... :)
----------------------------------------
विकासाची मोजदाद करायला
सोळा प्रश्णांची प्रश्णावली.
येणारी निवडणूकच सांगेल
कुणी कुणाची वाट लावली.
दिल्लीहून खास गुरुजी
पेपर तपासायला आले
गुजरातच्या विद्यार्थांना
वाटले नाहीत ते 'आप'ले :)
---------------------------------------
अमोल केळकर
७/३/१४
www.poertymazi.blogspot.in
चांगल्या चारोळ्या आहेत.
मनसे म्हणाली युतीला