तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..
पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!
कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?
मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... हेच निसर्गानी माणसाला शिकवलेलं रोखठोक उत्तर असावं... यावरचं!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6133
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालायचंच आत्मुदा.
चालायचंच आत्मुदा.
लग्नानंतर सासरी गेलेल्या
लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने हळवा झालेल्या बापाचे मनोगत छान मांडले आहे.
काय भावनेचा छडा लावलाय पण!
In reply to लग्नानंतर सासरी गेलेल्या by धन्या
काय भावनेचा छडा लावलाय पण!
खरच बापमाणुस आहेस तू धन्या!
धन्या मला तर हे आय्सिआय्सिआय
In reply to लग्नानंतर सासरी गेलेल्या by धन्या
धन्या मला तर हे आय्सिआय्सिआय मधील नाजुक हाताने घायाळ झालेले एका दिलफेक खातेदाराचे मनोगत वाटते.:-D
गुरजी पण मला आवडले नाही. त्यापेक्षा तुमचा खोकले अवतार पुनुर्ज्जिवित करा पाहू. :-D
माझा कुणाचा वाला ;-)
कधी कधी मला प्रश्न पडतो...
संमंध ?? संबंध असायला हवंय का?
पण चांगलं लिहिलंय..
संमंध ?? संबंध असायला हवंय का
In reply to कधी कधी मला प्रश्न पडतो... by आनन्दिता
बहुतेक ते संमंध असंच असावं. अतृप्त आत्म्याने लिहिलेली कविता आहे ना.
आणि 'अतृप्त' नाही, अत्रुप्त.
In reply to संमंध ?? संबंध असायला हवंय का by धन्या
=))
आणि 'अतृप्त' नाही, अत्रुप्त.
@संमंध ?? संबंध असायला हवंय
In reply to कधी कधी मला प्रश्न पडतो... by आनन्दिता
@संमंध ?? संबंध असायला हवंय का? >>> बरोब्बर... संबंध-- हाच योग्य शब्द आहे.माझा या शब्दाबाबत अनेकदा घोटाळा होतो.
(संपादकांना विनंती:- प्लीज शब्दबदल करुन द्या ना. :) )
@पण चांगलं लिहिलंय.. >>> धन्यवाद. :)
संबंध-- हाच योग्य शब्द आहे
In reply to @संमंध ?? संबंध असायला हवंय by अत्रुप्त आत्मा
घोटाळा होणारच. संमंध हा शब्द तुम्हाला नेहमीच जास्त जवळिकीचा वाटत असणार.
छान लिहिलंय, काय रे उगाच
छान लिहिलंय, काय रे उगाच टवाळी लावलीय? आत्मा मानगुट पकडेल तेह्वा समजेल :D
छ्या.
In reply to छान लिहिलंय, काय रे उगाच by यशोधरा
छ्या.
कैतरीच तुमचं.
टवाळी कुठे दिसली म्हणे तुम्हाला?
छान
नक्की कोण चावलं आत्माबुवांना, अकु की मोजी ...?
सुरूवात मस्त झाली होती
पण मग नंतर उगाच फिलऑसॉफीकल झाल्यासारखी वाटली
समंध चावलाय ...
अ आ याना कोणा माणसाची चावायची टाप आहे? नक्कीच समंध चावला. बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?
@बुवा, काय असल्या हळव्या
In reply to समंध चावलाय ... by चौकटराजा
@बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?>>> हम्म्म... बरोबर आहे आपलं! एकदा विदुषकाची टोपी चढली,की माणसानी 'आपण हळवे आहोत' हे ही विसरुन जायला पाहिजे. पडेल मला हळुहळू सवय. :)
बस कर पगले, अब रूलायेगा क्या?
In reply to @बुवा, काय असल्या हळव्या by अत्रुप्त आत्मा
बस कर पगले, अब रूलायेगा क्या?
रोइये जी खुषी से,रोके गा कोइ
In reply to बस कर पगले, अब रूलायेगा क्या? by प्रचेतस
रोइये जी खुषी से,रोके गा कोइ थोडे ही!? :)
(No subject)
In reply to रोइये जी खुषी से,रोके गा कोइ by अत्रुप्त आत्मा
:)
हम्म!
एव्ह्ड्याचसाठी अत्रुप्ती फक्त वैचारिक राखावी हेच बरे.
कधी कधी मला प्रश्न पडतो...
"मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?"
मस्त
आवडले....
मग येते,
मग येते,
काही क्षणांची विमनस्कता...
त्यावरची काही उत्तरं...
आणि पुन्हा जीवनाच्या
अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा
अपरिहार्य स्विकार...
सुरेख !
बुवा,
मस्त लिहिलंत! आता प्रवास जरा थांबवा.
गाडी स्टेशनात न्या म्हणायच
In reply to बुवा, by पैसा
गाडी स्टेशनात न्या म्हणायच आहे का?
हो हो.
In reply to गाडी स्टेशनात न्या म्हणायच by स्पंदना
अगदी अगदी!
(No subject)
In reply to हो हो. by पैसा
:)
सहमत!! गाडी ठेसनात पोचू देत
In reply to हो हो. by पैसा
सहमत!! गाडी ठेसनात पोचू देत लवकर अशा शुभेच्छा !! ;)
प्रिय व्यक्तिचा विरह, त्यातून
प्रिय व्यक्तिचा विरह, त्यातून आलेली व्याकुळता आणि असहाय्य्पणा अगदी व्यवस्थितपणे जाणवतो.....
रोइये जी खुषी से,रोके गा कोइ थोडे ही!?
कौन रोता हैं किसी और की खातिर ऐ दोस्त? सबको अपनीही किसी बात पे रोना आया.....
अवांतर : @धन्या : खुर्चीतून पडले हो!!!! :D
स्विकार ..
स्विकार नाही हो .. स्वीकार !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
प्रतिसाद संपला.
अहो, वेलांटी नाही; भावना
In reply to स्विकार .. by विटेकर
अहो, वेलांटी नाही; भावना महत्वाच्या. नाही का?
(No subject)
In reply to अहो, वेलांटी नाही; भावना by प्रचेतस
त्यांनी अत्रुप्त आत्मा असा
In reply to स्विकार .. by विटेकर
त्यांनी अत्रुप्त आत्मा असा आयडी घेतलेला असूनही तुम्ही शुद्धलेखन सुचवताय म्हटल्यावर तुमच्या धाडसाला त्रिवार मुजरा !!
होय
In reply to त्यांनी अत्रुप्त आत्मा असा by सूड
खरं आहे तुमचं !
आम्ही त्यांना त्यांच्या अ"त्रु"प्तीसह "स्वि"कारले आहे.