Skip to main content

(तनःशांती!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;) तनःशांतीचा शोध घेत होतो रात्रंदिवस 'फिटनेस'वर शोधले, 'वेटलॉस'वर आलो जाऊन 'बुलवर्कर' धुंडाळले 'टर्बो बॅग' काढली बुकलून 'केक' पाहिले बदलून 'लो कॅलरी'ही शोधत राहिलो 'ट्रेडमिल' झाले फिरवून 'स्पिनिंग' करत फिरलो निवांत क्षणी एका लकाकले डोळे, फिटली भ्रांती 'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा चतुरंग
लेखनविषय:

वाचने 3860
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! कोक-बर्गरचा लॅपटॉपशी संबंध कळला नाही, रंगाशेठ. बाकी 'भार' नियमन हा श्लेष आवडला. - सर्किट

चतुरंग सह्हीच्... 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा हा हा हा...मस्तच ('भार' नियमनाची सतत काळजी करणारी) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

ॐकारशेठ माफ करा पण चतुरंगसाहेबांच विडंबन मूळ कवितेपेक्षा जास्त छान जमलंय असं मला तरी वाटलं :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com

मस्त भारनियमनाचा श्लेष आवडला. स्वगत: 'तनःशांती' म्हंटल की जरा वेगळाच किडा डोक्यात येतो .. :P पण रंगाशेठनी लिहीले आहे म्हणजे काहीतरी वेगळे असणार अशी खात्री होती..('तनःशांती' एक्सपर्ट धनंजयाने देखिल ह्यावर एक 'खरपूस' विडंबन करावे का? ह. घ्या!) 'क्षुधाशांती' अधिक चपखल बसतो का? पण मग पहिल्या काही कडव्यांमध्ये गोंधळ होतोय.. ~X( -कोलूशेठ :)

In reply to by कोलबेर

आधी काही सूचक ओळी सुचल्याही होत्या पण पुढेपुढे ते फारच भडक आणि बीभत्स होत गेले त्यामुळे वेगळा बाज देऊन निराळे विडंबन केले पण 'तनःशांती' म्हणजे काय काय 'किडे' होतात हे लक्षात घेऊन नाव तसेच ठेवले! :P क्षुधाशांती? छ्या, अशा विडंबनाचे नावही कसे झटका देणारे हवे! :D चतुरंग

केसु सरांचा वारसा समर्थपणे चालवताय रावं भार'नियमन सहीच् नियमित भार'नियमन करणारा चेतन

रंगाशेठ, एकदम झकास.. आवडल.. चलू द्या.. (निवृत्त) केशवसुमार स्वगतः लॅपटॉप..तन:शांती ह्या रंग्याचे नक्की काय चलंय?... :?