सजतानाही थिजलेली ती
रोज मनाचे द्वंद्व मनाशी
भिंतीवरती बापुडवाणा
दिवा एकटा जळे स्वतःशी
बोथटलेली जुनी वेदना
जशी काजळी दिसे दिव्याची
जळता अवचित विझून जाणे
हीच वंचना जन्मभराची
अशा तमातुन प्रकाश कोठे
कुणी कुणाचा ना कैवारी
दिवा जळो वा शील, सुखाचे
मोल सारखे त्या बाजारी
तिजला ठावे दैव स्वतःचे
आयुष्याच्या सरत्या वाती
जोवर आहे तेल वाहते
दाह सोसणे उरले हाती
-- अमेय
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2806
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेमक्या शब्दातली अभिव्यक्ती.
नेमक्या शब्दातली अभिव्यक्ती. .... बोचतेय. :(
+१ आवडेश.
In reply to नेमक्या शब्दातली अभिव्यक्ती. by कवितानागेश
+१
आवडेश.
:(
खूप सुंदर लेखन. येऊ देत अजून.
अवांतरः
छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील?
तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! :)
राघवाशी पूर्ण सहमत!
In reply to :( by राघव
राघवाशी पूर्ण सहमत!
@छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील?
तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! Smile >>> तंतोतंत!
नेहमीप्रमाणेच सुरेख आणि
नेहमीप्रमाणेच सुरेख आणि लयबद्ध!!
काय छान कविता!
काय छान कविता!
हळवा मूड आणि जगण्याची
हळवा मूड आणि जगण्याची अपरिहार्यता अचूक व्यक्त करणारे शब्द ....
जबरदस्त!
जबरदस्त!
भावना थेट काळजात नेऊन भिडवतो हा माणूस. टोपी काढली आहे.
लीमाउजेट शी संपूर्ण सहमत
लीमाउजेट शी संपूर्ण सहमत
सुंदर
अमेयराव , सुंदर कविता लिहित आहात आपण !!
अप्रतिम !!
सुरेख रे दादू
कमी शब्दात कमाल आशय व्यक्त केलायंस!
अप्रतिम काव्यरचना
_/\_
सुरेख कविता!
अचूक शब्दात व्यक्त केलेलं दाहक वास्तव!
वा!
वा!