Skip to main content

शीळा घास

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:46 या दिवशी प्रकाशित केले.

शीळा घास

भीक मागत दारापुढे भिकारीण आली
फाटके पोलके अन जिरलेली चोळी
सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी
ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी

भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1

कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली
'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी
उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली
शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी

भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2

माय -माय करतच अनवाणी आली
भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली
आली आली अशी एक भिकारीण आली
शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली

भीक मागत दारापुढे भिकारीण आली

वैभव कुलकर्णी

लेखनविषय:

वाचने 1254
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हाताळला गेलेला विषय.

दोन लिखाणात पुरेशी विश्रांती घेतली नाही तर वाचक दमतिल.