Skip to main content

बेवडे

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवली बेवडे . पिता पिता बेवडे थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच सभोवतालचा! पिता पिता बेवडे अडखळतात, मागे बघतात, कि चाचपतात. . आपल्याच खिश्याला! पिता पिता बेवडे शिणतात, वैतागतात, कि विचार करतात.. "ते पिता आहेत, कि पाजवली जात आहे याचा!" पिता पिता बेवडे चाचपतात, विचार करतात, कि पडताळून पहातात.. "दु:ख आहे म्हणून.. ते पितात, कि ते पितात म्हणून.. दु:ख आहे?" पिता पिता बेवडे थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात!!! ==================== आपला केशवसुमार................२००८
लेखनविषय:

वाचने 6325
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

हं.. चांगले आहे. विडंबन आवडले -(पिता नसलेला) ऋषिकेश

हे काव्य बेवड्यांवर आहे का वडिलांवर (पिता) हे कळायला जरा कठीण गेले. ;) ह. घ्या. केसु, विडंबनांचा कारखाना जोरात दिसतोय.

विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेटेड?!! केशवा, आता तुझी काव्यप्रतिभा अंमळ तापली आहे, आता 'अनिरुद्ध अभ्यंकरला' बाहेर काढ आणि एखादी फर्मास गजल टाक बघू! एकदम वरीजिनल!! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

रंगाशेठ, त्याच काय आहे तो बाहेर आला की सगळे शब्द घाबरून पळून जातत (व्यथित)केशवसुमार स्वगतः ह्या रंग्याची डेरिंग वाढलीय हं :W , डायरेक्ट मलाच कच्चामाल मागतोय :O

In reply to by चतुरंग

त्या स्वातीताईंनी कविता करायला घेतल्यापासून केसुंनी तर फडशा पाडलाय एका एका कवितेचा....विडंबनं छान आहेत्..पण ते अभ्यंकरांना म्हणावं आम्ही गझलेची खूपच वाट पहातोय...प्लीज लिहा ना लोकाग्रहासाठी.. :) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by चतुरंग

अभ्यंकरांची दर्जेदार गझल वाचून फार दिवस झालेत. त्यांनीही लिहावे.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

पिता पिता बेवडे थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात
अहो टाकल्याव लई ल्वॉक इचारवंत बन्त्यात. (समविचारी) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

केसु, सुंदर विडंबन. पण जरा लांबल्या सारखे वाटते ;-) सहा गुण. - (विचारवंत) सर्किट

कविता सुंदर असली तरी, मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!! [( शाप देण्याच्या तयारीत, श्री श्री श्री डांबिसमहाराज महंत - लॉसेंजेलिसपीठ मिसळपावसंप्रदाय >:P

In reply to by पिवळा डांबिस

मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!! डांबिसा, तुझ्याशी सहमत रे! मीही हेच म्हणतो...! त्रिवार निषेध..! बाय द वे, मिसळपावसंप्रदाय हा शब्द आवडला! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

श्री श्री श्री डांबिसमहाराजशेठ, अता गाढवाला गाढव म्हणाचे नाही तर काय अश्वराज म्हणायचे का? डांबिसाला डांबिस नाहितर काय डांबिसमहारज म्हणायचे का? (अश्वराज)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

म्हणजे गाढवाला 'खर' म्हणायचं: खरराज खरवर इ.इ.

In reply to by धनंजय

चुकून खरवस वाचले;परत वाचता गाढव दिसले आणि खरवस अशक्य आहे हे जाणवले #-o (खरवर)बेसनलाडू

In reply to by केशवसुमार

पिता आणि बेवडे या चर्चेत हा गाढव कुठून काढलांत? आणि गाढवाला गर्दभराज म्हणता येईल की.... अश्वराज फारतर घोड्याला म्हणता येईल.... बाकी डांबिसाला तुम्हाला योग्य वाटेल ते काहीही म्हणा हो, त्याला तुमचा राग नाही....

केशवसुमार, >>विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेट.. चालु द्या...मस्तच आहे..वरील मंदळींचे प्रतिसाद वाचुन वाटत आहे की आता गझल होउन जाउ द्या.. स्वप्निल..

"दु:ख आहे म्हणून.. ते पितात, कि ते पितात म्हणून.. दु:ख आहे?" मस्तच !!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~