Skip to main content

शिवबाचि तलवार

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 16/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांची भवानी तलवार चाले - जिने हिंदुधर्माचे रक्षण केले , निराधार प्रजेला संरक्षण दिले निष्पाप प्रजेला भयमुक्त केले. बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले , अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले . मोगलाई बरखास्त झाली, स्थापला महाराष्ट्र धर्म , लोकशाहीची तुतार फुंकली , सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले , अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले . बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे , प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे , किती एक गड किल्ले काबीज केले. अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले . स्थापिले स्वराज्य झाला शिवबाला राज्याभिषेक, डोळ्याचे पारणे फिटले जिजाईचे ,अन आशीर्वाद लाभले भवानी मातेचे , अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे.
लेखनविषय:

वाचने 2700
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

तलवारीबद्दल आणि त्याप्रत तुमच्या भावनेबद्दल मनापासून आदर! पण तलवार कशी अशी खच्च कन एक घाव दोन तुकडे करते ना; तसं झालं नाही वाचून. या कवितेत बारीक बारीक तुकड्यांचं सॅलड झालंय असं वाटलं!

कवितेत शिवरायांपेक्षा भवानी तलवारीचच कौतिक आहे की. यावरून आठवलं. त्या अलिफ लैला मधला कर्तुत्वशुन्य लठ्ठ हिरो 'नेक बंदा' असल्यामुळे कुठलाही व्हिलन आला की वर आभाळाकडे बघून हात पसरून 'या अल्ला, कर मदत' म्हणत असे. आणि मग कुठल्यातरी 'तिलिस्मी ताकदीमुळे' तो त्यातून सहिसलामत सुटत असे.

बलाढ्य खानाचा वध म्हाराजानीच केला. पण शीर वेगळे मात्र मावळ्यानी नंतर केले. ( बरोबर ना? ) अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे. ते 'असे' वाचून बाँड / वकिली नोटिसा लिवणार्‍यांची आठवण आली. म्हणून नोटीस दिली असे. शेवटी असे लिहितात.

In reply to by उद्दाम

महाराज मावळ्यांना नोटीस देतायंत.... असं म्हणायचंय का कवियत्रीला?