कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा
तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा
तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव
तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा
जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित
जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा
हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया
तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा
---डॉ.कैलास गायकवाड
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1326
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !!
मस्त गज़ल !
विशेष करुन
!
हे दोन शेर खूप भावले .
-- प्रसाद
झकास हाय,फकस्त अजुन खटक्यात
झकास हाय,फकस्त अजुन खटक्यात बसायला पाहीजे होती! :)
आवडली
गझल.
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा
तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव
तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा
एकदम खास.
-दिलीप बिरुटे
खासच!
खासच!
छान...!
छान...!
वाचनीय
आकृतीबंध अन् वाचनीय.
लाजवाब !
गझल खुप छान ! प्रत्येक शेर आवडला मात्र -
"असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा"
हा लाजवाब !