आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल ...ते तसे नव्हतेच, पण...
ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासुन पाहिले,
मी जरा त्यांच्यातले नाते तपासुन पाहिले...
रोज रात्री ढोसली की , सोडुनी मज एकला,
नेमके, हे घर कुठे जाते ? तपासुन पाहिले...
त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते
का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले...
जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी
काल या छातीतले भाते तपासुन पाहिले...
रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ?
कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले...
...केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4074
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ
वा !!
In reply to काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ by सहज
वा ! मस्त!
In reply to वा !! by केशवसुमार
धन्यवाद!!
In reply to वा ! मस्त! by प्रमोद देव
हा हा!
मस्त रे केशवा!
लय भारी..
क्या बात है !!!!!!
रोज ती
धन्यवाद!!