अजाणता
लेखनविषय:
काव्यरस
अजाणता जाणले कसे
इप्सित शब्दांनी मनातले
भातुकलीने लक्ष्य वेधले
गतकाळात विखुरलेले
चिमणी पोपट बुलबुल आदी
सवंगडी सारे जमले
चित्त हरखले हरली चिंता
वय उरले शैशवातले
बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले
…………… अज्ञात
वाचने
1186
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडलेहे खासचं!! आवडले.
बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले
हे मला़ही आवडले !
वाह !!