चौथी सीट
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चौथी सीट
.
नकोच ती सीट चौथी,
हट जाऊ दे..
दाराशी उभे राहूनी,
वारा खाऊ दे!
पाठीचा कणा वाकवूनी,
तोल साधणे..
सरकेल का कुणी म्हणूनी,
वळून पाहणे!
पायात पाय गुंतवूनी,
आक्रसून राहणे..
अवघडलेल्या हातांनी,
आधार शोधणे!
नकोच ती डब्यातली,
घुसमट.. धुसफुसणे..
दाराशी उभे राहूनी
वारा खाऊ दे!
असेल ऊन कधी..
अंग जाळणारे!
झुम्मड पावसाचे कधी..
बसतील तडाखे!
टिपून घेतील भिजल्यावरी,
किरण कोवळे!
उन्हात सुखावतील कधी,
भुरभूर वारे!
मागे मागे धावणारी..
दिसतील स्थानके,
फलाटावर दिसतील थांबूनी..
जिवंत पुतळे!
रोज रोज पटरी वरूनी..
गरगर फिरणारे,
दिसेल चेहर्या चेहर्यावरी,
जीवन जाळे!
दिसतील एकटे झुंडींनी,
गर्दीत हरवलेले..
सापडतील गर्दीतले कधी,
क्षण एकटे!
क्षणात येईल कळूनी,
क्षणातले जगणे...
ऊन, पाऊस, वाऱ्याशी,
सम साधणे!
नकोच ती सीट चौथी,
हट जाऊ दे..
दाराशी उभे राहूनी,
वारा खाऊ दे!
=====================
स्वाती फडणीस............... ३०-०६-२००८
वाचने
3680
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मस्त!
आभारी आहे.
छान!
पुतळे,जाळे
छान आहे कविता....
In reply to छान आहे कविता.... by अविनाश ओगले
धन्यवाद
वा
छान
मनापासून आभार
स्वातीताई,
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद पाहून आनंद झाला.