वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला
पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला?
खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला
मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला...
आळसाची मीच माझ्या, ढाल अन केली जरी
प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी
दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले
नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले...
नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला
लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला
मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले
मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'...
उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे
कळले,नाही ढाल ती,'मुखवटा' आहे तिथे!
रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती?
आज मजला वाटते या,मुखवट्याची-ती भिती...
फेकुनी देऊन नशिबा,सत्य मी स्विकारिले
तरी माझ्या अंतरीने,सत्य ना स्विकारिले!
'आहे' 'जसा' तैसाच मि ही,मजला स्विकारितो.
कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4678
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा बुवा!
छान आहे....
सुरेख पण गंभीर कविता.
व्वा बुवा!!
@काय नको.>>>
In reply to व्वा बुवा!! by किसन शिंदे
छे छे!
In reply to @काय नको.>>> by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to छे छे! by पैसा
ह्म्म..
In reply to +१ by प्रचेतस
हेच म्हण्तो..
In reply to छे छे! by पैसा
आधी वाट्लं, मिपा बंद होते...
आवडली.
सुरेख.
कविता मस्तच. गंभीर आहे पण
आत्मुस गुर्जी. नका हो नका असे
कविता भारी आवडली हे सांगायचं
In reply to आत्मुस गुर्जी. नका हो नका असे by प्यारे१
सुरेख कविता.
सुरोख कविता, आवड्ली.
नशिब
तथाssssssssssस्तू!!!
In reply to नशिब by जेपी
भाऊसाहेब पाटणकर.......
श्टाइल तीच आहे..!
In reply to भाऊसाहेब पाटणकर....... by रानी १३