Skip to main content

नशिब!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 13/06/2013 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला? खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला... आळसाची मीच माझ्या, ढाल अन केली जरी प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले... नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'... उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे कळले,नाही ढाल ती,'मुखवटा' आहे तिथे! रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती? आज मजला वाटते या,मुखवट्याची-ती भिती... फेकुनी देऊन नशिबा,सत्य मी स्विकारिले तरी माझ्या अंतरीने,सत्य ना स्विकारिले! 'आहे' 'जसा' तैसाच मि ही,मजला स्विकारितो. कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4697
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

व्वा बुवा!!
पण आता जरा एखादे हलकेफुलके काव्य येउ द्यात.
काय नको. असंच धीरगंभीर लिहित रहा.

In reply to by पैसा

अगदी अगदी. बुवांची इनोदी काव्ये, विडंबने वाचायला लैच आवडतात. आम्हास त्यापासून असे वंचित करू नका.

कविता मस्तच. गंभीर आहे पण आवडली. वरती स्नेहांकिता म्हणताहेत तशी आम्हालापण शंका येऊ लागलीये-त्रुप्तीचे नक्की काय कारण आहे म्हणे भो आत्मूस भवान् ;)

आत्मुस गुर्जी. नका हो नका असे गंभीर होऊ, आमच्याकडं तशा प्रकारची वेगळी माणसं आहेत की ! तुम्चं डिपार्ट्मेंट वेगळं आहे का नाही? मग? ;)

In reply to by रानी १३

श्टाइल तीच आहे..! आंम्ही भाऊसाहेबांच्या शायरीचे परचंड फ्यान... त्यामुळे त्याचा वारा येणे स्वा भाविक आहे.