प्रतिसादांची कविता !!
लेखनविषय:
प्रतिसादांची कविता !!
‘आवडलेली ‘
कविता फार आवडली !
शेवटची ओळ जास्त भावली !
कल्पना आहे मस्त !
वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त !
..............." धन्यवाद !!!!"
‘ खूप आवडलेली ‘
Best ! super like !
मस्त जमलंय hike !
नवीन concept मांडलेली कविता !
तुम्ही फार छान लिहिता !
............."Thank you !!!!!"
‘ अर्धीच आवडलेली ‘
अश्रूंना धबधब्याची ची उपमा द्यायला हवी होती ,
पण डोळ्यांना head light ची उपमा साजेशी होती !
चांदण्यांना खेळण्यातल्या गोट्या म्हणालात ते आवडलं ,
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं वाक्य खटकलं !
..............." सूचनांचा विचार करू !!"
'न आवडलेली '
बरी आहे आधीपेक्षा !
विडंबन वाचा यापेक्षा !
ठीकठाकच आहे !
सुधारणेला वाव आहे !
............." नक्की सुधारणा करू !!!!"
" दिवस वाईट गेल्यावर .....वाचलेली …… "
खोलीला छप्परच नाहीये ना ? मग कवडसा कुठला ? !
सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वी नाहीये ...बाकीही ग्रह आहेत !
विमानात बसलेल्या कवीला तिसऱ्या कडव्यात झुकझुक गाडीचा आवाज आलाय !
टंक लेखन चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होतोय !
आपले तर no comments !!
...................." sorry sorry चुकालीये कविता !!!!"
वाचने
2517
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
(No subject)
In reply to (No subject) by अज्ञातकुल
subject नसलेला प्रतिसाद
In reply to subject नसलेला प्रतिसाद by फिझा
मग आता कसा द्यावा म्हण्ताय...
अपेक्षांचे व्यर्थ ओझे,
In reply to अपेक्षांचे व्यर्थ ओझे, by अत्रुप्त आत्मा
+१
प्र्यत्न रोचक आहे. इथे जे
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं
खालुन सहावी ओळ आवडली, असा
कल्पना आहे मस्त !
धन्यवाद. आता कुठल्याही
नवीन म्हणून आवडले
एक मोठ्ठी जांभई
ओव्हरलोड
In reply to ओव्हरलोड by लौंगी मिरची
पिझाबाई तुमच्या कविता
... पुढची कविता मीटरमध्ये
भा.पो. !